लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत सुविधा उपलब्ध नसल्याचा प्रकार आज समोर आला. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शहरातील एका रुग्णाची अचानक तब्येत खालावल्याने दाखल झालेल्या पथकासमोर हा प्रकार उघडकीस आल्याने नागरिकही संतप्त झालेत.शहरातील मुसलमान मोहोल्ला भागात वास्तव्य करणारा बापु बहिरम कोकणी (५२) हा इसम अत्यवस्थ झाल्याचा प्रकार घडला. रऊफ शेख यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेद्र भारुड यांना दुरध्वनीवरुन ही माहिती कळविल्यानंतर गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर वैद्यकीय पथकासह तेथे दाखल झाले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहीकेत रुग्णास न्यायचे मात्र कोरोनाच्या भितीपोटी हात मोजे नसतांना रुग्णास उचलायचे कसे? असा प्रश्न रुग्णवाहीके वरील कर्मचाऱ्यांना पडला. खुप वेळ याच्यातच गेला. शेवटी चादरीचा वापर करुन रुग्णास रुग्णवाहिकेपर्यंत आणुन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोनाची दहशत असतांना कर्मचारी व डॉक्टर यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. रुग्णांना वाहुन नेणारे वाहन सुविधायुक्त नसतील तर आरोग्य सेवाचा उपयोग तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांनी या प्रसंगी उपस्थित केला.सहा जणांवर कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हाभरात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात चार जण नंदुरबार शहरातील तर एकजण म्हसावद भागातील आणि एकजण तळोदा येथील आहे. नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन करू नये अन्यथा कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
हॅण्ड ग्लोव्हज नसल्याने चादरचा केला उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:31 IST