शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

सातपुडय़ातील जहाज म्हणून गाढवांचा होतोय उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या द:याखो:यात जेथे रस्ते नाहीत अशा ठिकाणी पुन्हा पूर्वीसारखाच गाढवांचा वापर होऊ लागला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुडय़ाच्या द:याखो:यात जेथे रस्ते नाहीत अशा ठिकाणी पुन्हा पूर्वीसारखाच गाढवांचा वापर होऊ लागला आहे. वाळवंटातील जहाज जसे उंट ओळखला जातो तसे आता सातपुडय़ातील जहाज ‘गाढव’ ओळख निर्माण करू लागले आहे.  सातपुडय़ाच्या द:याखो:यात दळणवळणाचे साधन पोहचल्याचा डांगोरा पिटला जातो. परंतु आजही अनेक गावे व पाडे असे आहेत तेथे जाण्यासाठी धड पायवाट नाही. अशा ठिकाणी सामान नेण्यासाठी गाढवांचाच वापर करावा लागतो. मध्यंतरी गाढवांऐवजी छोटे घोडे किंवा खेचर याचा वापर केला जात होता. परंतु वजन वाहून नेण्यात घोडे किंवा खेचर पेक्षा गाढव अधीक मजबूत असल्यामुळे आता पुन्हा गाढवांना मागणी वाढू लागली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाबच्या मालीआंबापाडासह तामणाई मालपाडा, डोणापाणी, ईराईपाडा, केडापाडा या  दोन ते अडीच किलोमीटर वरील गावांसह व पाच किलोमीटरवरील ईराईपाडा येथे जाण्याकरीता रस्ताच नसल्याने संसारोपयोगी साहीत्य डोक्यावर न्यावे लागत आहे. घरकूल योजनेअंतर्गत घर बांधकामासाठी लागणारे साहित्य देखील गाढवावरून न्यावे लागत आहे. मोलगीच्या मुख्य रस्त्यावरील  ठिकाणावरून डोंगरावरील नागमोडय़ा पायवाटेने नदी पार करीत रेती, कपची व विटा आदी साहीत्य न्यावे लागते.सातपुडय़ाच्या घाटातील मोलगी मार्गावर पाण्याच्या ङिारा म्हणून ओळख असलेल्या ठिकाणाहून डाबच्या मालीआंबापाडासह तामणाई मालपाडा, डोणापाणी, ईराईपाडा, केडापाडा या  दोन ते अडीच किलोमीटर व पाच किलोमीटरवरील ईराईपाडा येथे जाण्यासाठी रस्ताच  नाही. येथील नागरिकांना संसारोपयोगी साहीत्य डोक्यावर घेवून मोलगीच्या मुख्य रस्त्यापासून तर डोंगराच्या नागमोडय़ा पायवाटेने नदीच्या पलीकडे पुुन्हा डोंगर चढत जावे लागत असते. सद्या घरकुल लाभाथ्र्याच्या घराचे कामे सुरू असल्याने घर बांधकामासाठी लागणारे रेती, विटा, सिमेंट आदी साहित्यांची वाहतूक करण्यासाठी गाढवांचा आधार घ्यावा लागत  आहे. रांगतील अनेक तीव्र चढाव  किंवा उताराच्या ठिकाणी वस्ती करून वास्तव्य केले जाते. अशा ठिकाणी रस्ता करणे म्हणजे मोठे दिव्य असते. त्यामुळे अद्यापही पायवाटेचाच वापर या भागात केला जातो. जर जड साहित्य वाहून न्यायची वेळ आली तर मोठी कसरत असते. त्यामुळे सातपुडय़ात गाढवांचा उपयोग मोठय़ा प्रमाणावर केला जातो.