शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

दुकानांमधील युरिया संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सध्या खतटंचाई असल्याचे समोर आले असून यात प्रामुख्याने बाजारात युरियाच नसल्याचे दिसून आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सध्या खतटंचाई असल्याचे समोर आले असून यात प्रामुख्याने बाजारात युरियाच नसल्याचे दिसून आले आह़े़ ‘लोकमत’ने याबाबत दुकानांमध्ये तपासणी केली असता, कृषी सेवा केंद्र चालक युरियाच नसल्याचे सांगून हातवर करत आहेत़ यामुळे शेतकऱ्यांची फरफट सुरु झाली असून सकाळी शहरात येणारा शेतकरी रिकाम्या हाताने परत जात आहे़कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगामासाठी १ लाख १८ हजार १६० मे. टन रासायनिक खतांची मागणी कृषी विभागाने केली होती़ यातून ९८ हजार मेट्रीक टन खताला मंजूरी होती़ पैकी २४ हजार ६६० मेट्रीक टन खत पाठवण्यात आले होते़ यात १८ हजार मेट्रीक टन युरिया होता़ परंतु आता हा युरिया ‘संपला’ असल्याचे सांगण्यात येत आहे़ सोमवारपर्यंत मिश्र खते घेणार तरच युरिया देणार अशी भूमिका घेणारे खतविक्रेते मंगळवारी खतच नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवत आहेत़ गोडावून आणि दुकानांमध्ये केवळ मिश्र खते पडून असल्याचे सांगून शेतकºयांना परत पाठवण्याचे प्रकार सुरु झाले आहेत़‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील बाजार समिती परिसर, हाटदरवाजा आणि अंधारे चौक परिसरातील कृषी सेवा केंद्रांमध्ये चौकशी केली असता, युरियाच नसल्याचे सांगून परत पाठवण्यात आले़ नंदुरबार तालुक्याच्या विविध भागातून मंगळवारी खतांच्या खरेदीसाठी आलेले शेतकरी निराश परतल्याचे चित्र दिसून आले़ येत्या काळात पिकांना युरियाची गरज आहे़ मात्र युरिया कधी येणार हे सांगितले जात नसल्याने चिंता वाढल्या आहेत़शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खते आणि बियाणे विक्रेत्यांची दुकाने सर्वाधिक आहेत़ या ठिकाणी सर्व दुकानांवर चौकशी केली असता, कोठेही युरिया उपलब्ध नाही़ मात्र डीएपी, एमओपी, पोटॅश, एसएसपी आदी सर्व प्रकारची मिश्र खते पडून असल्याची माहिती देण्यात आली़ रॅकच लागला नसल्याने युरिया आलेला नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे़ दरम्यान गोडावूनमध्ये खते आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर ‘नाही’ असेच उत्तर देण्यात आले़ शहरातील बहुतांश विक्रेत्यांचे गोडावून हे अडगळीच्या ठिकाणी आहेत़ या गोडावूनची माहिती कृषी विभागाला देण्याची आवश्यकता आहे़ कृषी विभागाची भरारी पथके गोडावूनची तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी नंदुरबार शहरात मात्र मंगळवारी कोणत्याही प्रकारची तपासणी झालेली नाही़जिल्ह्यात १८ हजार २१ मेट्रीक टन युरिया खरीप हंगामासाठी उपलब्ध करुन देण्यात आला होता़ सर्वसाधारण जिल्ह्यात ७० मेट्रीक टन युरियाची आवश्यकता आहे़ याउलट उपलब्ध साठा हा केवळ २० टक्के होता़ यामुळे सध्या बाजारात युरियाची मोठी टंचाई निर्माण झाली आहे़ सध्या विक्रेत्यांकडे २ हजार ५१४ मेट्रीक टन डीएपी, १ हजार ८१९ मेट्रीक टन एमओपी, १३ हजार ९७ मेट्रीक टन एसएसपी तर १२ हजार ७९३ मेट्रीक टन मिश्र खते उपलब्ध असल्याची माहिती दिली गेली आहे़कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार देशात ५० टक्के युरिया आयात केला जातो़ परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे ही आयात बंद झाली आहे़ यातून देशभर युरिया टंचाई असल्याचा दावा केला जात आहे़जिल्ह्यात १ लाख १८ हजार मेट्रीक टन खतापैकी ९८ हजार मेट्रीक टन खत मंजूर झाल्यानंतर ते तातडीने प्राप्त होण्याची अपेक्षा होती़ परंतु जिल्ह्यात केवळ ३३ हजार ५१० मेट्रीक टन खताचा पुरवठा झाला आहे़ गेल्यावर्षीचा १७ हजार ८४५ मेट्रीक टन खत साठा मिळून केवळ ५१ हजार ३५५ मेट्रीक टन खतेच शेतकºयांना देण्यात आलेला असल्याने समस्या वाढल्या आहेत़