शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश जिल्ह्यासाठी फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 12:53 IST

राजकारण आणि पक्षापलीकडे एकनाथ खडसे हे कुटूंबातील वेगळे व्यक्तीमत्व असून त्यांनी सर्वांना एका माळेत बांधून ठेवले आहे. -जगदीश पटेल, खेडदिगर.

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नात्याने आपले व्याही आहेत. त्यांचे राजकारण व राजकीय दिशा हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे. आमच्याकडे आल्यानंतर व आम्ही देखील त्यांच्याशी कौटूंबिक नाते जिव्हाळ्यातूनच संपर्कात असतो. त्यांनी सद्या भाजपमधून राष्ट्रवादी कॅांग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यासंदर्भात महाराष्ट्रभर वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही तशी चर्चा आहे. या चर्चेशी आपला फारसा संबध नसला तरी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे आणि राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष सद्या राज्यात सत्तेत असल्याने खडसेंच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील त्यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्पांना चालना मिळू शकते. ते यासाठी निश्चित लक्ष घालतील असा आपल्याला विश्वास आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रवेश जिल्ह्यासाठी निश्चीतच फलदायी ठरेल याची आपल्याला खात्री आहे. 

विकासाचा पाठपुरावा... एकनाथ खडसे यांच्या या जिल्ह्याशी सुरुवातीपासून ऋणानुबंध आहे. नातेनंतर जुळले. त्यामुळे त्यांनी या जिल्ह्याच्या विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अनेकांचा वैयक्तीक अडचणीच्या वेळीही ते मदतीला धावून आले आहेत. पाटबंधारे मंत्री असतांना त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अनेक वर्षांपासून रखडलेेले प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजचे काम सुरू केले. नव्हेतर त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करून ते पुर्णही केले. आता राज्यात राष्ट्रवादीची सत्ता असल्याने ते निश्चितच उपसा योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा करतील. 

कन्या रक्षा खडसे या भाजपतर्फे खासदार आहेत त्यांचाही जिल्ह्यातील कामांसाठी पाठपुरावा असतो. पक्ष कुठलाही असो नाते संबधात मात्र कुठलाही तडा जाणार नाही. कारण कुटूंबातील खडसे हे एक वेगळे व्यक्तीमत्व असून सर्वांवर जीवापार प्रेम करतात.

खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने जिल्ह्यातील कार्यकर्तेही त्यांच्यासोबत पक्षांतर करतील का?एकनाथ खडसे यांचा राजकीय भुमिकेविषयी बोलण्याचा आपला काहीही अधिकार नाही. त्यांना भेटण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेते, कार्यकर्ते येथे येतात. त्यांच्यात काय चर्चा होते याबाबत आपण काहीही हस्तक्षेप करीत नाही. त्यांना मानणारे जिल्ह्यात कार्यकर्ते मोठे आहेत. आपलेही नातेसंबध जिल्ह्यात मोठे आहेत. पण कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी कुठल्या पक्षात प्रवेश करावा हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे. त्यामुळे कोण कुठल्या पक्षात जातील किंवा कोण पक्षांतर करेल हा प्रश्न आपल्यासाठी नाही. त्यामुळे त्याबाबत मी फारसे बोलू शकत नाही.