लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : मध्य प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील खेडदिगर येथे चेकपोस्टवर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात नसल्याचे सध्याचे चित्र आहे. तपासणी आणि कारवाईची मोहीम थंडावल्याने अनेक जण आपली वाहने घेऊन मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश करताना दिसून येत आहे.धुळेपाठोपाठ नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर चेकपोस्टवरून येणाºया-जाणाºया वाहनांची अधिक कसून चौकशी गरजेचे आहे. मात्र मध्य प्रदेश सीमेवरील खेडदिगर चेकपोस्टवरील कामाची पाहणी केली असता अनेक वाहने विनातपासणी करताच सोडली जात असल्याचे दिसून येते. शहादा-खेतिया महामार्गावरील मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागातील खेडदिगर येथे प्रवेश करणाºया वाहनांची तपासणी करण्यासाठी एक चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. चेकपोस्टवर काही वाहनांची तपासणी होते तर काही वाहनांना विनातपासणी प्रवेश दिला जात आहे. या चेकपोस्टवर शनिवारी दुपारी भेट दिली असता २० मिनिटांच्या कालावधीत चेकपोस्टवरून १० ते १२ दुचाकी, पाच ते सहा ट्रक व चारचाकी वाहनांनी जिल्ह्यात प्रवेश केला. या वाहनांची तपासणी करण्यात आली नाही. या वेळी केवळ तीन चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली. या चेकपोस्टवर वाहतूक पोलीस व पोलीस कर्मचारी दिसून आले. मात्र तेथे आरटीओ, आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी दिसून आला नाही. याठिकाणी असलेल्या नोंदवहीत शनिवारी सकाळी सात वाजेपासून दुपारी पाच वाजेपर्यंत एकूण ४० वाहनांची नोंद करण्यात आली होती.मध्य प्रदेशमधून येणाºया तसेच महाराष्ट्रातून जाणाºया सर्व वाहनांची तपासणी केली जात असून मध्य प्रदेश राज्यातून ई-पास धारकांना तसेच अत्यावश्यक सेवा देणाºया वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे.-किरण पवार, सहायक पोलीस निरीक्षक, म्हसावद पोलीस स्टेशन.मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असल्याने महाराष्ट्र राज्यातील खेडदिगर चेकपोस्टवर वाहनांची कडक तपासणी करूनच प्रवेश देण्यात यावा.-अविनाश मुसळदे, सरपंच, खेडदिगर, ता.शहादा.
सीमावर्ती भागात अनेकांचा बिनधास्त प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 13:14 IST