शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

‘घर तेथे झाड’चा कोपर्लीत अनोखा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गावाची, समाजाची उतराई होण्यासाठी अनेकजण उपक्रम राबवितात, असाच एक उपक्रम कोपर्ली, ता.नंदुरबारचे रहिवासी आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गावाची, समाजाची उतराई होण्यासाठी अनेकजण उपक्रम राबवितात, असाच एक उपक्रम कोपर्ली, ता.नंदुरबारचे रहिवासी आणि स्टॅम्प वेंडर संघटनेचे अध्यक्ष भिका चौधरी यांनी राबविला आहे. पर्यावरणाचा संदेश देत त्यांनी ‘घर तेथे झाड’ लावले. त्याचे संरक्षण करून संगोपनाची जबाबदारी त्या त्या कुटूंबाला दिली. दीड हजार घरे, झोपडय़ांसमोर आणि शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र परिसर असे मिळून जवळपास सहा हजार वृक्ष त्यांनी आतार्पयत लागवड केली आहेत. गावात जन्मलो, शिक्षण, नोकरी निमित्त दुस:या गावात, शहरात राहिलो आणि तेथेच स्थायिक झाल्यानंतर अनेकजण आपल्या गावाला विसरतात. परंतु काहीजण त्याला अपवाद असतात. आपल्या गावाची उतराई होण्यासाठी, लहानपणाच्या आठवणी गावासोबत घालविण्यासाठी काहीजण गावात उपक्रम राबवून गावाशी नाळ जुळवून ठेवतात. त्यातीलच कोपर्ली, ता.नंदुरबार येथील भिका जगन्नाथ चौधरी. वैयक्तिक उपक्रम राबविण्यापेक्षा त्यांनी सर्वाना सामावून घेत आईच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला. कमलाबाई जगन्नाथ चौधरी ट्रस्टच्या माध्यमातून ते गावात विविध उपक्रम राबवित आहेत.कोपर्ली, तापी काठावर वसलेले गाव, परंतु पर्यावरणाचा असमतोलामुळे गावात उन्हाळ्यात तीव्र तापमानाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता चौधरी यांनी ट्रस्टच्या माध्यमातून वृक्षारोपणाला महत्त्व दिले. घर तेथे झाड हा उपक्रम त्यांनी तीन वर्षापासून राबविला आहे. वृक्ष        लागवड करतांना एक किंवा दीड फुटाचे रोप न लावता थेट चार ते सहा फुटाचे रोप लावले जाते. त्यासाठी संरक्षक जाळी पुरविली जाते. ज्याच्या घरासमोर किंवा झोपडीसमोर वृक्ष लावले त्याच्याकडे संगोपनाची जबाबदारी. केवळ    सावली देणारे नाही तर त्यापासून काही उत्पादन येईल असे रोपे लागवड त्यांनी केली. त्यात  अशोका, बदाम, आंबा, नारळ, लिंब, बकुळ, पोष्टानपंप, जासवंती, रातराणी, सेवंती, चाफा, मोगरा, गुलमोहर, चांदणी, कन्हेर यासह इतर फळ पिकांचा समावेश आहे. आता ही रोपे मोठी झाली असून अंगणात सावली देखील मिळत आहे. लवकरच फूल व फळधारणा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यांच्या या उपक्रमात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी वेळोवेळी भेटी देत त्यांचा उत्साह वाढविला आहे. याशिवाय कोपर्लीचे सरपंच, युवक आणि रोटरी क्लब, नंदनगरी, मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ यांचेही सहकार्य लाभले. या उपक्रमासह गावातील गुणवंत विद्याथ्र्याना शैक्षणिक साहित्य वाटप, ग्रामपंचायीला शवपेटी देखील त्यांनी पुरविली आहे. पर्यावरणाचा अनोखा संदेश देणा:या या उपक्रमाची पंचक्रोशीत चर्चा आहे.