बाजारात गर्दी करणाऱ्यांना उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी दिली समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 11:42 AM2020-03-31T11:42:55+5:302020-03-31T11:43:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात होणाºया गर्दीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी उपविभागीय अधिकारी वसुमना ...

Understanding the sub-divisional officer Vasumana Pant gave the crowd to the market | बाजारात गर्दी करणाऱ्यांना उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी दिली समज

बाजारात गर्दी करणाऱ्यांना उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी दिली समज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात होणाºया गर्दीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी उपविभागीय अधिकारी वसुमना पंत यांनी सोमवारी सकाळी भेट देत नागरिकांना सूचना केल्या़ यावेळी त्यांच्यासोबत महसूल आणि पोलीस अधिकारीही होते़
शहरातील बाजारपेठेत सकाळी आठ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भाजीपाला तसेच इतर जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे़ बाजाराचे विलगीकरण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने करुन पाहिला आहे़ परंतू यानंतरही गर्दी कायम आहे़ सोमवारी सकाळी प्रांताधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी शहरात फिरुन नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले़ यावेळी ठिकठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून येत होते़ अंधारे चौक ते मोठा मारुती दरम्यान बँकेत पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक आले होते़ नागरिकांना सूचना करुन ते अंतर ठेवत नसल्याने चिंता व्यक्त होत होती़

Web Title: Understanding the sub-divisional officer Vasumana Pant gave the crowd to the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.