शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुव्यात व्यापा:यांविरोधात अॅट्रॉसिटींतर्गत गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:17 IST

धान्य दर विचारल्यावरून वाद : शहरात तणावपूर्ण शांतता

ठळक मुद्देव्यापारी गटाकडूनही पोलीसात फिर्याद अक्कलकुवा येथे काही दिवसांपूर्वी एका संघटनेचे कार्यकर्ते व व्यापारी यांच्यात वाद झाल्याने एक दिवस बाजार बंद ठेवण्यात आला होता़ व्यापा:यांच्या गटातर्फे पूनमचंद भंवरलाल जैन यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीव

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेतमालाचे भाव कमी जास्त का करतात, असे विचारल्याच्या कारणावरून अक्कलकुवा येथे दोन गटात वाद होऊन हाणामारी झाली़ यात एका गटाने दिलेल्या फिर्यादीवरून 50 व्यापा:यांविरोधात अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सोमवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान अक्कलकुवा शहरातील शेतमाल व्यापारी भवरलाल जैन यांच्या धान्य दुकानात जाऊन निलेश जयवंत पाडवी रा़ कडवामहू ता़ अक्कलकुवा याने सोयाबीनचे भाव कमी जास्त का करतात असा प्रश्न केला होता़ यावरून त्यांच्या वादावादी झाली़ यावेळी संशयित आरोपी भवरलाल जैन, बबलू चौधरी, नरेश मिलापचंद जैन, बबुआ मकराणा चौधरी यांच्यासह भवरलाल जैन यांची दोन मुले व इतर 50 व्यापा:यांनी निलेश पाडवी व त्याचा भाऊ समीर जयवंत पाडवी या दोघांना मारहाण करण्यास सुरूवात केली़ या दरम्यान त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली़ संशयित सर्व व्यापा:यांनी दोघांना बेदम मारहाण केल्याने ते जखमी झाले आहेत़ निलेश पाडवी याने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात रात्री उशिराने दिलेल्या फिर्यादीवरून सर्व संशयित 50 व्यापा:यांविरोधात जातीवाचक शिवीगाळ करण्यासह जमावबंदीचा आदेश झुगारून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े या प्रकारानंतर अक्कलकुवा शहरात तणाव निर्माण झाला होता़ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने तणाव परिस्थिती नियंत्रणात आली़ अक्कलकुवा विभागाचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी एम़बी़पाटील यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली़