शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित वनहक्कासाठी ‘उलगुलान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वनहक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही वैयक्तिक आणि सामुदायिक दावे प्रलंबित आहेत़ या दाव्यांना निकाली काढले जावे या मागणीसाठी लोकसंघर्ष मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढला होता़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा गेल्यानंतर आवारात प्रवेश न दिल्याने कार्यालयाबाहेर ठिय्या देत आंदोलन सुरुच ठेवले होते़लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, झिलाबाई वसावे, काथाभाऊ वसावे यांच्या मार्गदर्शनात शहरातील नेहरु चौकातून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला होता़ सुमारे दोन हजारपेक्षा अधिक आदिवासी महिला आणि पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते़ आंदोलकांकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार २०१८-१९ या वर्षात पडलेला दुष्काळ, २०१९ मधील अतीवृष्टी, अवेळी पाऊस या मुळे नुकसानीची भरपाई पंचनाम्यांप्रमाणे देण्यात यावी, २०१९ मध्ये अतीवृष्टी व अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले होते़ यापार्श्वभूमीवर शासनाने नोव्हेंबर २०१९ मध्ये अध्यादेश काढून भरपाई देण्याचे निश्चित केले होते़ परंतू यात वन जमीन धारक आणि प्रलंबित वनजमीन धारक यांचा उल्लेख राहून गेल्याने १० फेब्रुवारी रोजी महसूल व वनविभागाने सुधारित परिपत्रक काढले आहे़ त्यानुसार वन जमीन धारकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, वन कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी व्हावी, २०१८ मध्ये झालेल्या मोर्चाच्यावेळी मान्य केलेल्या दावेदारांचे अपील स्विकारले होते त्यावर अद्याप सुनवाई झालेली नाही ती तात्काळ करुन लोकांना न्याय द्यावा, अक्कलकुवा तळोदा व धडगाव ताुलक्यातील वनजमीन धारकांची १२ अ ची चौकशी व जीपीएस झालेले नाही ते तात्काळ करण्यात यावे, वनपट्टे धारकांना अक्कलकुवा तालुक्यातील रामपूर, कोलवीमाळ, व खाई ह्या गावांना दिल्याप्रमाणे सातबारे देण्यात यावेत, अक्कलकुवा तालुक्यातील अनेक दावे उपविभागीय समितीकडून गहाळ झाले असून ते दावे पुर्ननिर्माणाची जबाबदारी तळोदा उपविभागीय समितीने घेतली आहे ती तात्काळ पूर्ण करावी, सर्व वनपट्टेधारकांना पीक कर्ज उपलब्ध देण्यासह जमीन व उपजिविका सुधारणासंदर्भात विशेष योजना राबवण्यात याव्यात, सामुदायिक वन हक्काची जनपक्षीय अंमलबजावणी तात्काळ व्हावी यासह विविध मागण्या आहेत़निवेदनावर रमेश नाईक, जगन वळवी, बटेसिंग वळवी, रायसिंग वसावे, सायसिंग वसावे, भानुदास वळवी, धिरसिंग वसावे, चंपालाल नाईक, डिगंबर खर्डे, नटवर मोरे, दिलीप वळवी, मुकेश वळवी, नारु पाडवी, खेमजी गोवल्या वसावे, देविदास वळवी आदींच्या सह्या आहेत़