शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

नंदुरबारात पाईपलाईन फोडण्याचा पुन्हा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 13:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विघAसंतोषी लोकांकडून पालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडण्याचे प्रकार सुरूच आहे. गुरुवारी सकाळी कल्याणेश्वर मंदीराजवळ अज्ञात व्यक्तीने पाईप लाईन फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. दुरूस्तीसाठी संपुर्ण दिवस लागल्याने शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारी विरचक ते नंदुरबार व आष्टे ते नंदुरबार अशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विघAसंतोषी लोकांकडून पालिकेची पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फोडण्याचे प्रकार सुरूच आहे. गुरुवारी सकाळी कल्याणेश्वर मंदीराजवळ अज्ञात व्यक्तीने पाईप लाईन फोडल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. दुरूस्तीसाठी संपुर्ण दिवस लागल्याने शहरातील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारी विरचक ते नंदुरबार व आष्टे ते नंदुरबार अशा दोन पाईपलाईनी आहेत. विरचक प्रकल्पातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून थेट शहरातील जलकुंभामध्ये पाणी येते. तर आष्टे उद्भव क्षेत्रात आंबेबारा धरणातील पाणी आणून तेथून पंपींग करून ते पाईपाईनद्वारे आणण्यात येते. पैकी विरचकच्या पाईपलाईनला गुरुवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने खिळे मारून फोडली. कल्याणेश्वर मंदीराच्या जवळ हा प्रकार घडला. सकाळी हजारो लिटर पाणी वाया गेले. तातडीने या पाईपलाईनचा उपसा बंद करण्यात आला. त्यामुळे जलकुंभ भरण्यास अडचणी आल्याने गुरुवारी ज्या भागात पाणी पुरवठय़ाची वेळ होती त्या भागातील वेळापत्रक कोलमडले.दुरूस्तीसाठी पुर्ण दिवस वायापाईपलाईनच्या दुरूस्तीसाठी अर्थात ज्या ठिकाणी फोडली त्या ठिकाणी वेल्डींग करण्यासाठी संपुर्ण पाईपलाईन कोरडी करावी लागते. त्यानंतरच वेल्डींग केली जाते. त्यामुळे संपुर्ण दिवस लागला.शोध घेवून कारवाई करावीपाईन लाईन फोडण्याचा महिनाभरातील हा तिसरा प्रकार आहे. गेल्या महिन्यात धुळे चौफुलीलगत पाईपलाईन फोडण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठवडय़ात नांदरखेडा फाटय़ाजवळ पाईप लाईन फोडण्यात आली होती. आता कल्याणेश्वर मंदीराजवळ पाईप लाईन फोडण्यात आली. अशा विघAसंतोषी लोकांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.