लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वळणावर बसने दुचाकीला धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना वैंदाणे-खोक्राळे रस्त्यावर घडली. जखमींची नावे कळू शकली नाही. दरम्यान, बसचालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या खाली काटय़ांमध्ये उतरविल्याने उलटली नाही.नंदुरबार-वैंदाणे बस (क्रमांक एमएच 14- 0407) नेहमीप्रमाणे दुपारी वैंदाणेहून खोक्राळेमार्गे जात होती. वैंदाणे ते खोक्राळे रस्त्यावर वळण आणि काटेरी झुडपांमुळे समोरचे न दिसल्याने दुचाकी आणि बसची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी झाले. त्यांना तातडीने प्रवासी आणि खोक्राळे ग्रामस्थांनी मदतीचा हात देवून रुग्णालयात दाखल केले.अपघातानंतर बस चालकाकडून बस अनियंत्रीत झाली. परंतु प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या खाली चारीमध्ये काटेरी झुडपात थांबविण्यात चालकाला यश मिळाले. या अपघातात बसमधील प्रवाशांना काहीही ईजा झाली नाही. तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरार्पयत नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, हा रस्ता वळणाचा असल्यामुळे व काटेरी झुडपे वाढल्याने वाहन चालवतांना कसरत होते.
बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:04 IST