शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात दोन ट्रकांची समोरासमोर धडक, एक ठार

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 15, 2023 17:54 IST

हा अपघात नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल राजदरबार जवळ घडला.

नंदुरबार : भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकांची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात चालक ठार असून, एक जण जखमी झाला आहे. हा अपघात नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल राजदरबार जवळ घडला.

नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरून जात असताना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ट्रक क्रमांक एमएच २०- जीसी ११२६ व ट्रक क्रमांक एमएच १२- एनएक्स ३४६४) मध्ये जोरदार धडक झाली. ट्रकांवरील चालकांनी परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालविल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात ट्रक चालक शेख चांद शेख मोहमंद (२५) रा. खातगाव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर हा ठार झाला. तर नाजीज अजीज शेख, रा. रांजणगाव, ता. पैठण हा जखमी झाला आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

भल्या सकाळी अपघात झाल्याने काही वेळ वाहतूक देखील ठप्प झाली होती. दरम्यान, दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला नेण्यात आली होती. अपघात घडल्यानंतर दोन्ही वाहनांचे कॅबिन चक्काचूर झाले आहे. याप्रकरणी नाजीर अजीज शेख यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक (एमएच १२- एनएक्स ३४६४) वरील चालकाविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास हवालदार वसंत वसावे करीत आहेत.