नंदुरबार : बीअर शॅापी उघडून चोरट्यांनी दहा हजार ८०० रुपयांची बीअर व ८०० रुपये रोख चोरून नेल्याची घटना धडगाव येथे घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय भरत चव्हाण व योगेश केशवलाल चव्हाण, रा.काकावाडी, धडगाव असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, धडगाव येथील योगेश दिलीप पाटील यांचे बीअरशॅापीचे दुकान आहे. १५ मार्च रोजी रात्रीच्या वेळी दोघा चोरट्यांनी टॉमीच्या साहाय्याने दुकान फोडून आतील तब्बल १० हजार ८००रुपयांच्या बीअरच्या बाटल्या तसेच गल्ल्यातील ८०० रुपये रोख असा ११ हजार ६००रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
याबाबत योगेश पाटील यांनी फिर्याद दिल्याने अजय चव्हाण व योगेश चव्हाण यांच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक जी.आर.औताडे करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.