मंदाणे : सटीपाणी ता़ शहादा येथे शेतीच्या वाटणीवरून घडलेल्या दुहेरी खूनप्रकरणी पोलीसांनी आणखी दोघांना अटक केली आहे़ यातून अटकेतील आरोपींची संख्या नऊ झाली असून उर्वरित फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत़ पोलीसांनी याप्रकरणी हत्यारेही जप्त केली आहेत.अटक करण्यात आलेल्या आलेल्या दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़ या घटनेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सात जणांना तात्काळ अटक करण्यात आली होती़ सोमवारी गरबड अंग्रेशा पावरा व सुखीबाई तेरसिंग पावरा यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपी नाना ठोबा पावरा व ठोबा बंद्र्या पावरा यांच्या अटकेसाठी पोलीसांची शोधमोहिम सुरु आहे़ या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या शस्त्रांपैकी दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला हे करीत आहेत.रविवारी दुपारी सटीपाणी गावाजवळील शेतात हे दुहेरी हत्याकांड झाले होते़ यात फुलसिंग रामा पावरा व त्यांचा मुलगा धर्मा पावरा यांचा जागीच मृत्यू झाला होता़ घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती़
सटीपाणी दुहरी खूनप्रकरणी आणखी दोन जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:48 IST