शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

नंदुरबार जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना घडली. याबाबत तळोदा व धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोनजण ठार झाल्याची घटना घडली. याबाबत तळोदा व धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिला अपघात तळोदा-अक्कलकुवा रस्त्यावर नळगव्हाण फाट्याजवळ घडला. लादी व लादीची पावडर घेऊन जाणारा भरधाव ट्रकवरील (क्रमांक जीजे ३६-टी ०३५८) चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने रस्त्याच्या कडेला असलेल्या निलगिरीच्या झाडाला धडक दिली. त्यात चालक हरदेवसिंह जगुम इझाला रा. रातीदेवली, ता. बाकानेर हे जखमी झाले. उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार गोवर्धन वसावे यांनी फिर्याद दिल्याने तळोदा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरिक्षक पंडित सोनवणे करीत आहे.

दुसरी घटना धनाजे बुद्रूकचा डुगटीपाडा, ता. धडगाव येथे घडली. शिंदवाणीचा आमलीटूरपाडा, ता.धडगाव येथील सर्वीस बहादऱ्या पावरा हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच १९-के ६४६९) भरधाव जात असतांना त्यांचा ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्यालगतच्या झाडाला धडकली. त्यात त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यामागे बसलेले जयसिंग बहादऱ्या पावरा व रुमा सामा पाडवी हे जखमी झाले. याबाबत बहादऱ्या पावरा यांनी फिर्याद दिल्याने धडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस कर्मचारी वसईकर करीत आहे.