शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू

By रमाकांत.फकीरा.पाटील | Updated: September 27, 2023 21:59 IST

एकाच दिवशी नवापूर तालुक्यातील तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाड्याच्या धरणात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत भवर, ता.नवापूर येथील धरणात बुडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी नवापूर तालुक्यातील तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नवापूर तालुक्यातील मोगराणी ग्रामपंचायत अंतर्गत बर्डीपाडा धरणात आर्यन गोरख वळवी (१४), प्रीतम गोरख वळवी (१२) असे दोघे सख्खे भाऊ त्यांच्या शेतालगत असलेल्या धरणात गेले असता धरणाच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले आणि  त्यांचा मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र, ते अयशस्वी ठरले. दरम्यान या दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी व खांडबारा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. दोन्ही सख्या भावांचा मृत्यू झाल्याने आई-वडिलांनी प्रचंड आक्रोश केला.

नवापूरच्या युवकाचाही मृत्यूदरम्यान, नवापूर शहरातील प्रभाकर कॉलनीतील निखिल कैलास राजपूत (१७) या युवकाचाही भवरे येथील धरणात बुडून मृत्यू झाला. निखिल व त्याचे सहकारी चार मित्र भवरे धरणावर पोहोण्यासाठी गेले असता धरणातील गाळात अडकल्याने निखिलचा मृत्यू झाला. तो नवापूर येथील सार्वजनिक गुजराथी हायस्कूलमध्ये ११ वीच्या वर्गात शिकत होता. त्याचा मृतदेह नवापूर उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आला. तेथे नातेवाईक व मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. या घटनेची नोंद नवापूर पोलिसात करण्यात आली आहे. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेNanduraनांदूरा