शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात ठिकठिकाणी तुळशी विवाह उत्साहात, विठुरायांची पालखीत मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/रांझणी : प्रबोधिनी एकादशीनिमित्त नंदुरबार शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े यात सायंकाळी तुळशी विवाह, विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक आदींचा समावेश होता़सकाळी नंदुरबार येथील विठ्ठल मंदिरात पुरोहितांकडून काकड आरती, अखंड हरिनाम जप, होमहवन आदी विविध कार्यक्रम घेण्यात आल़े सकाळी पाच             ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/रांझणी : प्रबोधिनी एकादशीनिमित्त नंदुरबार शहरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होत़े यात सायंकाळी तुळशी विवाह, विठ्ठलाच्या पालखीची मिरवणूक आदींचा समावेश होता़सकाळी नंदुरबार येथील विठ्ठल मंदिरात पुरोहितांकडून काकड आरती, अखंड हरिनाम जप, होमहवन आदी विविध कार्यक्रम घेण्यात आल़े सकाळी पाच             वाजता विठ्ठल मंदिरात काकड आरतीला सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर अभिषेक होऊन महापूजा करण्यात आली़  या वेळी शहरातील मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होत़े मोठी एकादशी असल्याने भाविकांकडून सकाळीच मंदिरात दर्शनासाठी गर्दी करण्यात आली होती़ शहरातून पालखी सोहळ्याचे आयोजन प्रबोधिनी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरातर्फे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होत़े पालखीत विठुरायाची प्रतिमा ठेवण्यात आली होती़ आकर्षक पध्दतीने पालखी सजविण्यात   आली होती़ लक्ष्मीनगर, भुनेश्र्वर  नगर, स्वामी समर्थ नगर आदी  शहरातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती़ भाविकांकडून पालखीचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या टाकण्यात आल्या  होत्या़ तसेच ठिकठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांकडून गर्दी करण्यात आली होती़ भजनी मंडळ विठुरायांच्या गितावर थिरकत होत़े महिलांनी भगवे ध्वज, भगव्या साडय़ा परिधान केलेल्य होत्या़ यावेळी संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होत़े दरम्यान, तळोदा तालुक्यातील रांझणी येथील विठ्ठल मंदिरात कार्तिक शुध्द एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादीशीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांझणीसह परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच हजेरी लावली होती़पहाटे काकडआरती झाल्यानंतर विठुरायाची महापूजा भास्करभाई कदमबांडे (कुकरमुंडा) यांच्या हस्ते करण्यात आली़ त्यानंतर श्रीहरींची पालखी मिरवणूक काढण्यात आली़ दिवभर रांझणीसह परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती़            दरम्यान, विठ्ठल मंदिरात अखंड  हरिनाम किर्तन सप्ताह सुरु असून त्याअंतर्गत रात्री हभप जिवराज महाराज सूर्यवंशी (कापडणेकर) यांच्या किर्तनाचेही आयोजन करण्यात आले आह़े दरम्यान विठ्ठल मंदिरात काकड, भजन, अभंग आदी विविध धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात पहाटेपासून करण्यात आली  होती़ प्रबोधिनी एकादशीनिमित्त अखंड हरिनाम जपासह, होमहवनाचेही कार्यक्रम घेण्यात आले होत़े  या कार्यक्रमांमुळे निद्रेत असलेले भगवंत कार्तिक एकादशीला जागे होऊन विश्वाचे कल्याण करीत असल्याची भाविकांची  श्रध्दा  आह़े