शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

पपईने भरलेला ट्रक उलटल्याने जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर अक्कलकुवा ते खापरच्या दरम्यान पपईने भरलेला ट्रक उलटल्यामुळे पूर्णपणे जळाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात ट्रकमध्ये भरलेली पपई पूर्णपणे जळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा येथून पपई भरून गुजरात राज्यात जाणारा ट्रक (क्रमांक आर.जे.19 जी.ए. 7619)  बुधवारी रात्री बारा ते एक वाजेच्या  सुमारास ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर अक्कलकुवा ते खापरच्या दरम्यान पपईने भरलेला ट्रक उलटल्यामुळे पूर्णपणे जळाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात ट्रकमध्ये भरलेली पपई पूर्णपणे जळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा येथून पपई भरून गुजरात राज्यात जाणारा ट्रक (क्रमांक आर.जे.19 जी.ए. 7619)  बुधवारी रात्री बारा ते एक वाजेच्या  सुमारास अक्कलकुवा ते खापर दरम्यानच्या जामली फाटय़ाजवळील वळणावर आला असता भरधाव वेग व वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण  सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात जाऊन आदळला. भरधाव वेगात असलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रकने पेट घेतला. या ट्रकमध्ये चालकासह सहचालक असे दोन जण असल्याची माहिती पोलीस  सूत्रांकडून देण्यात आली. यात चालकाला गंभीर दुखापत झाली तर सहचालकही जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक व अन्य वाहन चालकांनी ट्रकमधून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी हलविले.या ट्रकमध्ये पपई भरलेली होती. शहाद्याहून व्यापा:यांनी खरेदी केलेली ही पपई गुजरात राज्यात घेऊन जात असताना ही घटना घडली. या अपघातात ट्रकने पेट घेतल्याने ट्रकमधील  निम्म्याहून जास्त पपई पूर्णपणे जाळून खाक झाली तर उर्वरित पपई भाजली गेल्याने तीदेखील निरुपयोगी ठरणार आहे. यामुळे व्यापा:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रकदेखील पूर्णपणे जळाला आहे. अवघ्या अर्धा ते पाऊण तासात ट्रकची कॅबीन पूर्णपणे जळून खाक झाली.   सकाळी 11 वाजेपर्यत ट्रकचे काही अवशेष जळत होते. रात्रीच्या         सुमारास आगीचे व धुराचे लोळ उठल्याने परिसरातील नागरीकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. बुधवारी रात्री झालेल्या या अपघाताची नोंद गुरुवारी सायंकाळर्पयत पोलिसांत करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जखमींची नावे समजू शकली नाहीत.अक्कलकुवा ते खापर दरम्यान रस्त्याचा भाग अपघात प्रवणक्षेत्र बनला आहे. वर्षभर या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असते. त्यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी अक्कलकुवा ते खापर दरम्यान कौली फाटय़ाच्या पुढील पेट्रोलपंपच्या परिसरात एकाच दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला होता. तर  याच जामली फाटय़ाच्या वळणावर भरधाव ट्रक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणा:या त्याच खड्डय़ात जाऊन उलटला होता. राज्यमार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सातत्याने होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी भरधाव व अनियंत्रित वाहतुकीला चाप तसेच बेशिस्त वाहन चालकांवर संबंधित प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु अशी कोणतीही कारवाई किंवा उपाययोजना प्रशासनाकडून होताना दिसून येत नाही.