लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 14 : घटस्फोटीत सुनेने सासूला घरातून बाहेर काढण्यासाठी तिच्या अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रय} केल्याच्या आरोपावरून सुनेस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 15 हजार रुपये दंड आणि तीन वर्ष चांगल्या वर्तवणुकीचा बॉण्ड करून देण्याची शिक्षा सुनावली. कोपर्ली येथील भिकुबाई भाईदास शिरसाठ ही महिला गावातील रमाई आवास घरकुलात राहत होती. तिची घटस्फोटीत सून मंगलाबाई ओंकार पवार हीने घरकुल बळकविण्याच्या इराद्याने 29 सप्टेंबर 2016 रोजी घरात घुसून सासूला धक्काबुकी केली होती. कॅनमधील रॉकेल ओतून भिकुबाई यांना जाळण्याचा प्रय} केला होता. याबाबत भिकुबाई शिरसाठ यांनी तालुका पोलिसात सून मंगलाबाई पवार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरिक्षक सुभाष भोये यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधिश गुप्ता यांच्या पुढे या खटल्याचे कामकाज चालले. न्यायालयाने मंगलाबाई यांना 15 हजार रुपये दंड आणि तीन वर्षाच्या चांगल्या वतरूवणुकीचा बॉण्ड लिहून देण्याची शिक्षा सुनावली. सरकारी वकिल व्ही.सी.चव्हाण यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.
कोपर्लीत सासूला जाळण्याचा प्रयत्न, सुनेला 15 हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 13:14 IST