लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील बाजारपेठ सायंकाळी चार वाजेनंतर बंद करण्याच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत असल्याचे चित्र आहे. कॉलनी भागात मात्र किरकोळ विक्रीची दुकाने काही ठिकाणी सुरू राहत असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ने केलेल्या रियॅलिटी चेक मध्ये शहरात हे चित्र दिसून आले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाची साखळ तोडण्यासाठी नंदुरबार शहरातील बाजारपेठ सायंकाळी चार वाजेनंतर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी सात वाजेची वेळमर्यादा होती ती कमी करून चार वाजेची करण्यात आली आहे. या वेळेचे पालन सर्व व्यावसायिक काटेकोरपणे करत असल्याचे दिसून येत आहे.चौकातील पोलीसकरतात आवाहनचौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आलेला आहे. ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना चार वाजता त्या त्या भागातील दुकानदारांना बंदच्या सुचना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार चार वाजताच त्या त्या भागातील पोलीस कर्मचारी दुकानदारांना बंद करण्याचे आवाहन करतात. याशिवाय शहर पोलीस ठाण्याचे गस्ती वाहन देखील गस्त घालून व्यावसायिकांना बंद करण्याच्या सुचना करतात.छोटे व्यावसायिक हवालदिलसायंकाळी चार वाजेची वेळमर्यादामुळे छोटे व्यावसायिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. सायंकाळच्या वेळी खाद्य पदार्थांच्या लॉरी, चाटच्या लॉरी यासह इतर विविध व्यावसयिक आपला व्यवसाय करीत असतात. अशा व्यावसायिकांना चार वाजेच्या मर्यादेमुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. परराज्यातून आलेले व्यावसायिक यामुळे आपापल्या गावी निघून गेले आहेत तर काहींनी दुसºया शहरात आश्रय घेतला आहे.दुध विक्रेत्यांना सूटचार वाजेच्या वेळेत मात्र दूध विक्रेत्यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे दूध विक्री केंद्र ठिकठिकाणी सुरू असल्याचे दिसून आले. ज्या ठिकाणी गर्दी होत होती त्या ठिकाणी ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे दिसून आले. याशिवाय चौकाचौकात देखील दूध विक्रेते दिसून आले.भाविकांची गर्दीगणेशोत्सव सुरू असल्याने गणेश मंडळांच्या परिसरात तसेच मंदीरांच्या परिसरात नारळ व फूलहार विक्रेते काही ठिकाणी दिसून आले. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतांनाही त्यांना मुभा देण्यात आली.
चार वाजेनंतर व्यवहार होतात ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 12:32 IST