शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

ई-मंडी अंतर्गत आडत्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 12:13 IST

ऑनलाईन बाजार भाव : 30 बाजार समितींमध्ये नंदुरबारचा समावेश

ठळक मुद्दे विविध माध्यमातून होणार कामकाज ई-नाम योजनेच्या अनुषंगाने आवकची नोंद, साठय़ाचे व्यवस्थापन, शेतमालाची गुणवत्ता तपासणे, ई-ऑक्शन, शेतमालाचे वजन, सेल एग्रीमेंट, सेल बील, ऑनलाईन पेमेंट व जावक गेट एन्ट्री आदीप्रमाणे कामकाज होणार आहे. शेतमालाच्या किंमतीत चढ उतार

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीमधील संगणकीय लिलाव व इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटय़ाद्वारे मोजमाप करण्याच्या नवीन पद्धतीचे व्यापारी, आडते व सर्व संबधित घटकांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. राज्यातील 30 बाजार समितींमध्ये ही पद्धत पहिल्या टप्प्यात लागू करण्यात आली आहे.राष्ट्रीय कृषी बाजार या योजनेअंतर्गत बाजार समितीत आलेल्या शेतमालाचे संगणकीय लिलाव व इलेक्ट्रॉनिक्स काटय़ाद्वारे मोजमाप करण्याच्या पद्धतीची अंमलबजावणी येथील बाजार समितीत देखील करण्यात येत आहे. त्याअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात आले. बाजार ई-नाम पोर्टलवर आतार्पयत 227 व्यापा:यांनी व 68 आडते यांनी नोंद केली आहे. या योजनेच्या उद्दीष्टानुसार राष्ट्रीय स्तरावर सामाईक बाजाराची स्थापना, विक्री व्यवहार पद्धतीत सुसूत्रता व समानता, पारदर्शक विक्री व्यवस्था, स्पर्धात्मक किंमत आणि तत्पर ऑनलाईन पेमेंट, शेतमालाचे ग्रेडींग त्यामुळे खरदेदीदारांना गुणवत्तेची माहिती होणे, स्थिर किंमतीमुळे ग्राहकांना वाजवी किंमतीत चांगल्या गुणवत्तेचा माल उपलब्ध होणार आहे. यामुळे खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढल्यावर शेतमालाला चांगला भाव मिळणार असून त्याचा फायदा शेतक:यांना होणार आहे. यावेळी जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक दिग्विजय आहेर, जिल्हा पणन व्यवस्थापक सचिन पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, बाजार समितीचे सभापती भरतभाई पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उपस्थित होते. येत्या हंगामापासून ज्वारी, मका, बाजरी, गहू व दादर आदी शेतमालाचे लिलाव हे उभ्या वाहनात होऊन खरेदीदार यांचे बाजार समिती आवारातील प्लॉटवर मोजमाप करण्यात येईल. शेतमाल विक्रेत्यांच्या बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर नोंदणी करण्याकरीता शेतमाल विक्रीस आणतांना बँक पासबुकची ङोरॉक्स व आधार कार्ड ङोरॉक्स सोबत आणणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.