पुलावरील वाहतूक ठरतेय धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:32 PM2020-02-19T12:32:41+5:302020-02-19T12:32:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान गोमाई नदीवरील पुलाची अत्यंत दुर्दशा झाली असून हा ...

Traffic on the bridge is dangerous | पुलावरील वाहतूक ठरतेय धोकेदायक

पुलावरील वाहतूक ठरतेय धोकेदायक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान गोमाई नदीवरील पुलाची अत्यंत दुर्दशा झाली असून हा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक बनला आहे. पुलाच्या जार्इंटमधील लोखंडी सळ्या व पट्ट्या बाहेर आल्या असून संरक्षक कठडे ठिकठिकाणी तुटले आहेत. या पुलावरुन अवजड वाहन गेल्या पूल अक्षरश: हलतो. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
प्रकाशा ते शहादा मार्गावर डामरखेडा गावाजवळ गोमाई नदीवरील पूल अत्यंत जीर्ण झाला आहे. पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पुलाचे जार्इंट उखडले आहेत. त्यातून लोखंडी सळ्या व पट्ट्या बाहेर आल्याने त्या वाहनधारकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. पुलाचे संरक्षक कठडे ठिकठिकाणी तुटले आहेत. काहींना मोठे तडे गेले आहेत. पुलाची आधीच दुर्दशा झाली असताना मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये अवजड वाहन आदळले तर पूल अक्षरश: हलतो.
प्रकाशाकडून शहाद्याकडे जाताना पुलाचा सुरुवातीलाच डाव्या बाजूला संरक्षक भिंत कोसळली आहे. त्यामुळे एखादे वाहन थेट नदीत जाऊन कोसळेल अशी स्थिती याठिकाणी झाली आहे. पुलाचा डाव्या बाजूला जॉर्इंटमधून बाहेर आलेली लोखंडी पट्टी अपघाताला आमंत्रण देत आहे. दोन फूट एवढी उंच ही पट्टी आहे. रात्रीच्यावेळी वाहनधारकांना ही लोखंडी पट्टी दिसली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाच्या झालेल्या दुर्दशेकडे संबंधित विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Traffic on the bridge is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.