शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

सोंगाड्यांची पारंपरिक कला उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र गाव दिवाळीची धुम सुरू आहे. गावदिवाळीनिमित्त होणाऱ्या सोंगाड्यांच्या कार्यक्रमात मनावर वार करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र गाव दिवाळीची धुम सुरू आहे. गावदिवाळीनिमित्त होणाऱ्या सोंगाड्यांच्या कार्यक्रमात मनावर वार करुन जाणारे सावत्र आई, विविध कारणांनी विभक्त होणारा परिवार, व्यसनांमुळे उघड्यावर येणारा संसार असे भावनिक विषय प्रभावीपणे मांडले जात आहे. शिवाय हसून-हसून लोटपोट करणारे विषयही कलात्मक पद्धतीने मांडले जात आहे. परंतु या सोंगड्या पार्टीतील कलाकारांना प्रशासकीय पातळीवरुन कुठलीही दखल घेतली जात नाही.आदिवासींमधील बºया-वाईट बाबींना समाजाभिमुख करण्याची सुरुवात गांडा गिंबा तमाशा पार्टीने केली. १९६० मधील दुष्काळामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी आदिवासींचा कुठलाही जोडधंदा नव्हता त्यांना गुजरातमधील रोजंदारीशिवाय एकही उपाय नव्हता. गांडा गिंबा रा.सागाळी ता. नवापूर यांनी कुटुंबियांच्या उपजिविकेसाठी तमाशाला सुरूवात केली. त्यांनी वाड्या-पाड्यांवर मनोरंजन केले. नाटकातून गांडा गिंबा हे एखादा ज्वलंत विषय असा तरी अगदी कल्पकतेने मांडत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. तमाशा सादर करण्यासाठी जातांना भोजनाची सुविधा होत होती शिवाय आर्थिक लाभही होत होता. त्याचे काही मित्रही सोबतीने खेडोपाडी तमाशा सादर करु लागले. उपजिवीकेसाठी केलेली सुरुवात आज जनजागृतीचे प्रभावी माध्यम बनले. समाजसुधारक पार्ट्या म्हणूनही ओळख निर्माण झाली.पूर्वी एका रात्रीसाठी ५ ते १० रुपये घेऊन तमाशाचे कार्यक्रम होऊ लागले. पार्टीत सर्व कलाकार पुरुषच असून स्त्रिची भूमिकाही पुरुषच करीत आहे. गांडा गिंबा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कलागुणांना प्रतिसाद मिळत गेला, समाजात पार्टी नावारुपास आली. तमाशा बघणाºयांची संख्याही झपाट्याने वाढली. त्यानंतर दादी सोंगाड्या, मोजू कर्मा पाडवी यांच्यासह बाबू खोडदेकर, राजमोही, सोमावल, करंजवेल अशा सोंगाड्या पार्टी अस्तित्वात आल्या.सोंगाड्यातील कलाकारामार्फत गायले जाणाºया याहा मोगी मातेच्या गीत रुपातील कथा ऐकुन प्रत्येक आदिवासी गहिवरुन जात आहे. चैतन्यमय वातावरण निर्माण होत आहे. कुठेही रोडाली सुरू झाल्यास निश्चितच पायाचाही ठेका सुरू होतो. १९७० च्या दशकात मोजू कर्मा पाडवी (लोयकर) सोनारेकर, केवलीपाडा या पार्ट्या प्रकाशात आल्या. बाबूराव पाडवी (खोडदेकर) यांनीही नवी पार्टी सुरू करीत मनोरंजन क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. बाबू सोंगाड्यांचे विनोद अगदी हृदयाला जाऊन भिडत होते, त्यामुळे प्रत्येक जण हसून लोटपोट होत होते. भावनिक प्रसंगाचे प्रदर्शन होताच उपस्थितांना भावना अनावर होत होत्या.गांडा गिंबांसह आज दित्या सोंगाड्या, देवल्या व सोनारेकर पार्टीचे गुलाबसिंग कलाकार आपल्यात राहिले नसले तरी त्यांचा वारसा आज पुढे सुरूच आहे. लोय ता.नंदुरबार येथील रहिवासी तथा आदर्श कलाकार किसन, गोरख, नामा हे देखील समाज प्रबोधनात योगदान देत आहे. नवीन कलाकारांमध्येही दर्जेदार कला आहे. परंतु आर्थिकदृट्या बेदखल होत असल्याने त्यांच्यातील कलाच संकटात सापडली आहे. कला कायमस्वरुपी राहावी यासाठी समाजासह प्रशासकीय पातळीवरुन उपाययोजना होणे आवश्यक आहे.

४दर्जेदार कला असतानाही हे कलाकार गुजतरामध्ये उदरनिर्वासाठी जातात ही बाब मन दु:खावणारी ठरते. अन्य समाजातील कलाकारांना पेन्शन, घरे व जागा दिली जात असताना आदिवासी कलाकारांच्या नशिबी हे भाग्य का येत नाही? असा प्रश्न उपस्थित होती. या कलाकारांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली, परंतु ती कलाकारांसाठी स्वप्नवतच ठरली. ज्यांनी आपले आयुष्य समाजाच्या मनोरंजनासाठी घालवले त्यांना विसरुन चालणार नाही.४सोंगाड्यांकडून ज्वलंत विषयांवरही प्रबोधन करण्यात येत आहे. समाजात चांगल्या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीही हे कलाकार योगदान देत आहेत. सोंगाड्यांमार्फत सावत्र आई हे नाटक सादर करुन उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करण्यात येते. अशावेळी बहुतांश बांधवांना अश्रु अनावर होतात. तर वास्तव जीवन जगणाऱ्यांकडून कलाकारांना विशेष दाद दिली जाते. गर्दीतही हुंदक्यांचा आवाज येतो. ही बाब कलाकार उपस्थितांच्या थेट मनावर परिणाम केल्याचे सिद्ध करुन जाते.