शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

लॉकडाऊनचा फायदा उचलत व्यापाऱ्यांकडून पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. परंतु प्रशासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला. परंतु प्रशासनाच्या सहकार्याने त्यावर तोडगाही निघाला. शेतीमाल वाहतुकीसाठी रितसर परवाना घेऊन वाहतुकीस परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. परंतु या लॉकडाऊनचा फायदा घेत पपई खरेदीदार व्यापारी मात्र शेतकºयांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. चार रुपये प्रती किलोप्रमाणे पपईची खरेदी सुरू असून अचानक भाव कोसळल्याने शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहे.जिल्ह्यात बहुतांश शेतकºयांनी पपईची लागवड केली आहे. यंदा उशिराने लागवड झाल्याने फळधारणाही उशीराच झाली. त्यामुळे ऐन बहरात असताना व्यापाºयांनी अनेकवेळा हंगामात शेतकºयांना दरासंबंधी वेठीस धरले होते. आता तर कोरोनाचे कारण पुढे करत शेतकºयांना पुरते मेटाकुटीस आणले आहे. पपई हे नाशवंत पीक असल्यामुळे शेतकºयांना त्याचा साठाही करता येत नाही. शिवाय बाजारपेठ जवळपास नसल्याने स्वत:ही विकणे अवघड होते. त्यामुळे सर्वस्वी व्यापाºयांवर अवलंबून राहावे लागत आहे. पपई खरेदीदार व्यापारी मात्र संधीचे सोने करण्याची तसूभरही संधी सोडत नाहीत हे आजपर्यंत घडलेल्या घटनांवरून जाणवते. वास्तविक पाहता बाहेरील राज्यांमध्ये पपईची ठोक विक्री १६ ते १७ रुपयांप्रमाणे सुरू आहे. व्यापाºयांना माल खरेदी करून संबंधित बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी सहा रुपये प्रती किलोप्रमाणे खर्च येत असल्याचे सांगितले जाते. तरीही शेतकºयांकडून चार रुपये किलोप्रमाणे खरेदी सुरू आहे. यात मात्र शेतकरी होरपळत आहे.४लॉकडाऊन असलेल्या परिस्थितीत प्रशासनाने शेतीमाल वाहतुकीसाठी मुभा दिली असली तरी व्यापारी शेतकºयांच्या मालाला तोडणीसाठी धजावत नव्हते. शहादा पालिकेचे नगरसेवक संदीप पाटील यांनी पुढाकार घेत प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी व व्यापारी यांच्यात एक बैठक घेऊन माल तोडणीसंबंधी तोडगा काढला व शेतकºयांच्या मालाला तोडण्याचे आवाहन केले. मात्र दरासंबंधीचा तोडगा अद्यापही कायम आहे. तो तोडगा निघावा व शेतकºयांची होणारी होरफळ थांबवावी, अशी मागणी होत आहे.शेतकºयांची पपई झाडावरच पिकत होती. लॉकडाऊनचे कारण पुढे करत व्यापारी तोडणीस धजावत नव्हते. प्रशासन व व्यापारी यांच्यात बैठक घेऊन पपई तोडणीसंबंधी तोडगा निघाला. परंतु दराबाबतची समस्या अजूनही कायम आहे.-संदीप पाटील, नगरसेवक व पपई उत्पादक शेतकरी, शहादा.