शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

मंदीचा बागुलबुवा करत पपईचे दर व्यापाऱ्यांनी पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदीचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला १४ रुपये दर देण्यास असमर्थता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उत्तर भारतीय बाजारपेठेत मंदीचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी पपईला १४ रुपये दर देण्यास असमर्थता दर्शविली आहे. पपई उत्पादक संघर्ष समिती, व्यापारी, शेतकरी व बाजार समिती यांच्यात झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांनी तीन रुपये दर कमी करत ११ रुपये ५ पैसे प्रमाणे खरेदीचा निर्णय घेतल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ दरम्यान पपई हे नाशवंत पिक असल्याने हताश झालेल्या शेतकºयांनीही व्यापाºयांचा दर मान्य केला आहे़शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या दराबाबत सोडवण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात आली. व्यापाºयांनी बोलावलेल्या या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी, पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, उमेश पाटील, सतीश पाटील, सत्यदेव पाटील, प्रफुल्ल पाटील, अमोल पाटील, नितीन चौधरी, अनिल पाटील यांच्यासह शेतकरी सदस्यआणि व्यापारी प्रतिनिधी यांच्यामध्ये दराबाबत तिढा सोडवण्यासाठी चर्चा करण्यात आली़ रात्री उशिरापर्यंत ही चर्चा सुरु होती़ त्यात ११ रुपये पाच पैसे प्रतिकिलो प्रमाणे दर देण्याचे निश्चित करण्यात आले़पपई हे नाशवंत पीक असल्याने व्यापाºयांनी त्याची खरेदी न केल्यास नुकसानीची भिती असल्याने शेतकºयांनी नाईलाजाने रात्री उशिरा ठरवण्यात आलेल्या दरांवर सहमती दर्शवली होती़ सध्या ऊन वाढत असल्याने फळ खराब होण्याची भिती असल्याने ओढाताण करणे योग्य नसल्याचे सांगत शेतकºयांनी समंजस भूमिका घेत पपई तोड सुरु करण्यास परवानगी दिली़ विशेष म्हणजे मंगळवारपासून शहादा तालुक्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून व्यापाºयांनी पपई तोड बंद करुन मालाची उचल करणे थांबवले होते़

गुजरात व आंध्र प्रदेशातील पपईचे उत्पादन निघायला सुरुवात झाल्याने उत्तर भारतातील बाजारपेठेत सध्या भाव घसरत असल्याचे व्यापारी सांगत आहेत़ परिणामी शेतकऱ्यांना १४ रुपये ५५ पैसे प्रतिकिलो दराने पैसे देणे परवडणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले़ यावेळी बैठकीत संपूर्ण बाजारपेठेतील आॅनलाईन दर काढण्यात आले. सर्वच ठिकाणी पंधरा रुपयांहून अधिक दर असल्याचे शेतकऱ्यांनी दर्शवून दिले होते़ यानंतरही व्यापाºयांनी ऐकून घेतले नाही़ शेतकºयांनी दिलेले दरही मान्य न करता ११ रुपये ५ पैसे याप्रमाणे पपई खरेदी करण्याचे सांगून टाकले होते़ व्यापाºयांच्या या धोरणावर शेतकºयांनी बराच वेळी चर्चा केली होती़ बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी वेळावेळी चर्चा घडवून आणल्यानंतरही व्यापारी तयार होत नसल्याने अखेर त्यांच्या मागणीच्या दरांमध्ये पपई विक्री करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला़

पपई उत्पादक अणि व्यापारी यांच्यात आजवर असंख्य बैठका झाल्या परंतू एकाही व्यापाऱ्याने बाजारात दर चांगला आहे़ म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर देऊ केले नाहीत़ उलट तेजी असतानाही दर कपात करण्यावर अधिक भर दिला़ व्यापाºयांकडून मनमानी पद्धतीने दर वाढवणे आणि घटवणे याची कारवाई होत असल्याचे सांगत शेतकºयांनी बैठक नाराजी व्यक्त केली़ व्यापाºयांच्या या मनमानी कारभारात यापुढे शासनाने हस्तक्षेप करुन दरांबाबत योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे़ शहादा तालुक्यात दरवर्षी दरांवरुन शेतकरी व्यापारी संघर्ष सुरु होतो़