निवेदनात म्हटले आहे की, नवापूर मर्चेट सेवा असोसिएशन व व्यापारी मागील मार्च महिन्यापासून शासनाने लागू केलेला लॉकडाऊन नुसार राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे निर्बंध व्यापारी बांधव पाळत आहेत. परंतु यापुढे या परिस्थितीत उदर निर्वाह करणे शक्य होणार नाही. त्यामुळे १ जून पासून शहरातील सर्व दुकानदारांना दुकाने उघडण्याची सरसकट परवानगी द्यावी.
नवापूर शहर आणि तालुक्यात कोरोना रूग्ण संख्या आटोक्यात असून, परिस्थिती ही नियंत्रणमध्ये आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्याचा समावेश हा रेडझोनमध्ये येत नाही. व्यापार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. निवेदनावर नवापूर मर्चट सेवा असोशिएशनचे अध्यक्ष राजेश अग्रवाल, मंगेश येवले, विजय बागूल, जितेंद्र अहिरे, नीलेश प्रजापत यांच्या सह्या आहेत. या वेळी व्यापारी किरण टिभे, राजेंद्र सोनी, मुकेश चावला, धर्मेंद्र प्रजापत, राकेश सोनार, प्रशांत ठाकरे, प्रदिप चौधरी आदी व्यापारी उपस्थित होते.
संचारबंदीत व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वीज बिल, व्यापारी संकुलचे भाडे, मजुरांचे रोजगार व्याजाने सुरू केलेला व्यवसाय लोन ठप्प झाल्याने लोन भरण्यासाठी पुरेसा पैसा नसल्याने आर्थिक चणचण व्यवसायिकांना भासत असल्याने जिल्हा प्रशासनाने लवकर यावर तोडगा काढून १ जूनपासून सर्व व्यवसायिकांना आस्थापना उघडण्याची परवानगी द्यावी. - राजेश अग्रवाल, अध्यक्ष, नवापूर मर्चंट सेवा असोसिएशन