शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

स्थानिक पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची ओढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : मागील १५ दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगा हिरवळीने नटल्या आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : मागील १५ दिवसांपासून सातपुडा पर्वतरांगात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे सातपुड्याच्या पर्वतरांगा हिरवळीने नटल्या आहेत. लॉकडाऊनमुळे मागील चार महिन्यापासून घरातच असणाऱ्या लोकांची पावले स्थानिक पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत.दरवर्षी पहिला पाऊस झाला की सातपुड्याच्या पर्वतरांगांवर मोठ्या प्रमाणात गवत व नवीन झाडेझुडपे उगवतात. यामुळे सातपुडा पर्वतरांगांवर हिरवी चादर आच्छादली गेल्याचा भास होतो. याशिवाय पावसाने जोर पकडल्यानंतर सातपुड्यातील चांदसैली, देवगोई, दहेल या घाटात दाट धुके पसरते. या सर्व बाबी सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाºया तरूणाईला मोठ्या प्रमाणात खुणावतात. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मे महिन्याच्या उन्हाळी सुटीत कोणालाही पर्यटनासाठी बाहेरील पर्यटनस्थळांवर जाता आले नाही. अजूनही कोरोनाचा धोका टळला नसून पुढील नजीकच्या काळात पर्यटनाचा आनंद कधी घेता येईल याबाबत निश्चित सांगता येणे शक्य नाही. शासनाने जरी पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी खुली केली तरी लोक कोरोनाच्या भीतीमुळे बाहेरील पर्यटनस्थळांकडे पाठ फिरवतील, असा अंदाज आहे. अशातच सातपुडा हिरवळीने बहरल्यामुळे जिल्ह्यातील पर्यटकांची पावले सातपुड्याच्या दिशेने वळू लागली आहेत. मागील शनिवारी व रविवारी सुटीचे दिवस असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबीयांसह सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये भ्रमंती करताना दिसून आले.मागील आठवड्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेत पावसाची दररोज हजेरी सुरू होती. यामुळे कोठार, माकडटेकडी, चांदसैली घाट या परिसरात सकाळपासून दाट धुके पाहायला मिळत आहे. अद्याप दमदार पाऊस झाला नसून सातपुड्यातील नद्या-नाले व धबधबे सुरू झालेले नाहीत. दमदार पाऊस झाला की सातपुड्यातील नदी-नाले व धबधबे खळाळून वाहायला सुरुवात होते. असे असले तरी घरातच बंद असलेल्या नागरिकांना सुरुवातीत सातपुड्यात पसरलेली हिरवळ व त्यासह अनेक नयनरम्या दृष्य भुरळ घालीत आहेत. लॉकडाऊनमुळे घरातच राहून कंटाळलेले लोक निसर्गचा आनंद घेण्यासाठी सातपुड्याच्या कुशीत गर्दी करताना दिसून येत आहेत. तरुण मुले तर आपल्या मित्रांच्या ग्रुपसह दोन-तीन कापड्यांचे ड्रेस व स्वतंत्र कॅमरा घेऊन फोटोग्राफीसाठी दररोज चांदसैली घाटात दिसून येत आहेत. तर काही आपल्या परिवारासह सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेत आहेत.सातपुडा पर्वतरांगात अनेक पर्यटनस्थळे असून पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा विकास अद्याप होऊ शकलेला नाही. पावसाळ्यात नव्हे तर वर्षभर पर्यटकांना आकर्षित करतील अशी बरीच स्थळे कोठार ते धडगाव, अक्कलकुवा ते मोलगी यादरम्यान आहेत. अनेक स्थळे तर सह्याद्री व कोकणातील पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत. ‘व्ह्यू पार्इंट’ म्हणून ती विकसित करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घेता यावा यासाठी संरक्षक कठडे, मार्गदर्शक सूचना फलक, उभे राहण्यासाठी व बसण्यासाठी पुरेशी जागा, छत यासारख्या अनेक बाबी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीदेखील होऊ शकते. सातपुड्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पर्यटकांकडून करण्यात येत आहे.