विविध गटातील लसीकरणानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांची पहिल्या डोसची टक्केवारी ८७.३४ तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ४७.१९ टक्के आहे. फ्रंटलाईन वर्कर यांची पहिल्या डोसची टक्केवारी १०० तर दुसऱ्या डोसची २३ टक्के आहे. १८ ते ४४ वयोगटातील पहिल्या डोसची ४.३० टक्केवारी तर दुसऱ्या डोसची ०.४१ आहे. तर ४५ पेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांची लसीकरणाच्या पहिल्या डोसची टक्केवारी ३९.८८ तर दुसऱ्या डोसची ५.९३ इतकी टक्केवारी आहे.
जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्र वाढविण्यात आले आहेत. विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. त्याचा चांगला परिणाम होत आहे. सर्व विभागांचे सहकार्य आणि टीम वर्क यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. लवकरच उद्दिष्टांच्या तुलनेत ५० टक्के लसीकरण पूर्ण होईल असे नियोजन असून सर्वांचे त्यासाठी सहकार्य अपेक्षित आहे.
- डाॅ.राजेंद्र भारूड, जिल्हाधिकारी.