शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ंआदिवासी आश्रमशाळांसाठी आता टोल फ्री रुग्णवाहिका

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: October 2, 2018 11:55 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आश्रम शाळांमधील आजारी विद्याथ्र्याना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आता चार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका व इतर सुविधा राहणार आहे. राज्यातील 108 क्रमांकांच्या रुग्णवाहिकेच्या धर्तीवर ही सुविधा राहणार आहे. राज्यातील 14 प्रकल्पातील 301 आश्रमशाळा व ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आश्रम शाळांमधील आजारी विद्याथ्र्याना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आता चार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका व इतर सुविधा राहणार आहे. राज्यातील 108 क्रमांकांच्या रुग्णवाहिकेच्या धर्तीवर ही सुविधा राहणार आहे. राज्यातील 14 प्रकल्पातील 301 आश्रमशाळा व आठ एकलव्य निवासी शाळांना याचा लाभ मिळणार आहे. नंदुरबार व तळोदा प्रकल्पासाठी 13 रुग्णवाहिका मंजुर करण्यात आल्या आहेत. राज्यातील विशेषत: दुर्गम भागातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याच्या विविध कारणांनी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आदिवासी समाजात मोठय़ा प्रमाणावर रोष आहे. ही बाब लक्षात घेता आता आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना लागलीच वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी  108 रुग्णवाहिका सेवेची जोड मिळणार आहे. राज्यातील कळवण, तळोदा, धुळे, यावल, नंदुरबार, राजूर, किनवट, पांढरकवडा, धारणी, कळमनुरी, नागपूर, गढचिरोली, अहेरी, भामरागड या 14 प्रकल्पातील 301 आश्रमशाळा आणि आठ एकलव्य निवासी इंग्रजी शाळांसाठी ही सुविधा राहणार आहे.अशी राहील सुविधाचार ते पाच आश्रमशाळा मिळून एक रुग्णवाहिका राहणार आहे. या शाळांच्या मध्यवर्ती भागात जी शाळा असेल त्या शाळेत रुग्णवाहिका थांबण्याची सोय राहणार आहे. त्यात डॉक्टर, प्रशिक्षीत परिचारिका, आरोग्य सेवक, चालक आदी स्टाफ राहणार असून आवश्यक ती वैद्यकीय सेवा त्यात उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी त्या त्या आश्रम शाळेत बसण्याची व निवासाची, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. टोल फ्री क्रमांकसध्या सुरू असलेल्या 108 क्रमांकावरूनच या रुग्णवाहिकेशी संपर्क साधता येणार आहे. संपर्क साधल्यानंतर 15 ते 35 मिनिटात रुग्णवाहिका संबधीत आश्रम शाळेत  पोहचेल असे नियोजन असेल. अर्थात मध्यवर्ती ठिकाणी ती उभी    करण्याची सोय त्यादृष्टीने करण्यात येणार आहे.अत्याधुनिक रुग्णवाहिकाआदिवासी विकास विभाग व भारत विकास ग्रृप यांच्या संयुक्त माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी अत्याधुनिक व सर्व आरोग्य सेवांनी परिपुर्ण असलेल्या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. लवकरच संबधीत प्रकल्प कार्यालयांना त्या पोहचविल्या जाणार आहेत.जिल्ह्यात 13 रुग्णवाहिकानंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व तळोदा प्रकल्पासाठी एकुण 13 रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. त्यात नंदुरबार प्रकल्पासाठी सहा तर तळोदा प्रकल्पासाठी सात रुग्णवाहिका, तेवढे डॉक्टर, परिचारिक व आरोग्य सेवक आणि चालक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नंदुरबार प्रकल्पाअंतर्गत इंग्रजी माध्यम शाळा नंदुरबार, नावली आश्रम शाळा, देवमोगरा आश्रमशाळा, रामपूर आश्रमशाळा, तोरणमाळ आश्रम शाळा येथे रुग्णवाहिका थांबा राहणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात आश्रम शाळांमध्ये सर्पदंश, सिकलसेल यासह इतर कारणांनी विद्यार्थी मृत्यूचे प्रमाण अधीक आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक विद्याथ्र्याचे जीव गेले आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात आतार्पयत तीन विद्याथ्र्याना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. ही बाब लक्षात घेता या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील आश्रम शाळांमध्ये मोबाईल रेंजचा प्रॉब्लेम असतो. अशा वेळी पर्यायी व्यवस्था काय राहणार याबाबत मात्र, उपाय सुचविण्यात आलेले नाही. भारतीय विकास ग्रृपचे या सर्व उपक्रमात सहकार्य मिळणार आहे. योजना आदिवासी विकास विभाग राबविणार आहे.