शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तिळगूळ वाटप पडले महाग : शहाद्यात दीड लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 17:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सुवर्ण नगरीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून चोरटय़ांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली. यात जवळपास एक लाख 44 हजाराचा एवज लंपास झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.शहरातील डोंगरगाव रोड लगत असलेल्या सुवर्ण नगरीतील प्लॉट नं 67 मध्ये भुपेंद्र अरुण जोशी हे भाडेकरू म्हणून राहतात. ते प्रकाशा येथील जलसंपदा ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील सुवर्ण नगरीत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून चोरटय़ांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली. यात जवळपास एक लाख 44 हजाराचा एवज लंपास झाल्याने शहरात खळबळ माजली आहे.शहरातील डोंगरगाव रोड लगत असलेल्या सुवर्ण नगरीतील प्लॉट नं 67 मध्ये भुपेंद्र अरुण जोशी हे भाडेकरू म्हणून राहतात. ते प्रकाशा येथील जलसंपदा विभागात कार्यरत आहेत. मकरसंक्रांत असल्याने शनिवारी सकाळी साडेदहा वाजता ते सहकुटुंब अमळनेर येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. रविवारी रात्री साडेनऊ वाजता परत आल्यावर घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलुप तोडलेले आढळून आले. घरात प्रवेश केल्यावर त्यांना घरातील गोदरेज कपाट व लाकडी कपाटातील सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळला. त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्वरित पोलीसाना पाचारण केले. पोलीस सूत्रानुसार गोदरेज कपाटातून 60 हजार रुपये किमतीची 40 ग्रॅम सोन्याची मंगल पोत, 30 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम सोन्याचा हार, 30 हजार रुपये किमतीचा 20 ग्रॅम सोन्याचा राणीहार तर देवघरातून 15 हजार रुपये किमतीची चांदीची गणपतीची मुर्ती व रोकड 9 हजार रुपये असा एकूण एक लाख 44 हजार रुपयाचा एवज अज्ञात चोरटय़ांनी लंपास केला. या चोरीमुळे परिसरात दशहतीचे वातावरण पसरले आहे . घटनास्थळी शहाद्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत ,  पो.हे.काँ. बापू धुडकू शिंदेसह पोलीस  कर्मचा:यांनी भेट दिली. या वेळी फिंगर प्रिंट वाल्याना पाचारण करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. सुवर्ण नगरीत आत्तार्पयत  दोनवेळा चोरीची घटना घडली आहे. त्याप्रमाणे शहादा शहरात वारंवार घरफोडी, मोटारसायकली चोरी जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने  पोलीसापुढे मोठे आव्हान आहे. शहरासह नवीन वसाहतीत वारंवार होत असलेल्या चोरीमुळे पोलीसांचा चोरांवर असलेला वचक व दबदबा कमी झाल्याचे बोलले जात  आहे.