शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

घर जाळल्याच्या आरोपाखाली तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिला बचत गटातर्फे रेशन दुकान चालविणा:या महिलेचे घर पेटवून पाच लाखांचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिला बचत गटातर्फे रेशन दुकान चालविणा:या महिलेचे घर पेटवून पाच लाखांचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यातील तिघांना शहादा न्यायालयाने पाच वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उंबराणीपाडा, ता.अक्कलकुवा येथे 8 एप्रिल 2014 रोजी रात्री ही घटना घडली होती.उंबराणीपाडा, ता.अक्कलकुवा येथील दमणीबाई देवला पाडवी ही महिला गावात महिला बचत गटाचे सचिव तसेच महिला बचतगट संचलित स्वस्त धान्य दुकान चालवीत होत्या. गावातीलच शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी यांनी   दमणीबाई व आहटीबाई यांना शिविगाळ करून मारहाण केली होती. त्याबाबत त्यांनी मोलगी पोलिसात फिर्याद दिली. त्याचा राग शिवाजी पाडवी यांना आला होता. त्यातून त्यांनी दमणीबाई यांना ठार मारण्याची व घर पेटवून देण्याची धमकी दिली होती. 8 एप्रिल 2014 रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास दमणीबाई व परिवार झोपले असतांना अचानक त्यांना घर जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी जीव जीव वाचविण्यासाठी बाहेर धाव घेतली. त्यावेळी शिवाजी पाडवी व इतर दोनजण पळून जातांना त्यांनी पाहिले. आग विझविण्यासाठी काहीही साधन नसल्याने सर्व घर जळून खाक झाले. घरात 60 हजार रुपये रोख, 14 क्विंटल धान्य, म्हैस, उसनवारीचे 50 हजार रोख, संसारोपयोगी सामान असा एकुण पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले होते. याबाबत मोलगी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक गोरक्षनाथ पालवे यांनी तपास करून दोषारोपपत्र शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्या. पी.बी.नायकवाड यांच्या कोर्टात हा खटला चालला. साक्षी, पुरावे लक्षात घेता न्या.नायकवाड यांनी शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी सर्व रा.उंबराणीपाडा यांना पाच वर्ष सश्रम कारावास व   दहा हजार रुपये दंड आणि भादंवि कलम 429 मध्ये तीन वर्ष कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.विनोद गोसावी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून नासिरखान पठाण होते.