शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

टँकर दरीत कोसळून तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:49 IST

पोलीसांचे मदतकार्य : कोंडाईबारी घाटातील अपघात

विसरवाडी : भरधाव टँकर पहाटे दरीत कोसळून तीनजण जखमी झाल्याची घटना विसरवाडीनजीक कोंडाईबारी घाटात घडली. दरम्यान, वेळीच महामार्ग पोलिसांनी धाव घेतल्याने चालकासह तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.धुळ्याकडून सुरतकडे जाणारे तेलाचे टँकर (क्रमांक जीजे-12 एङोड 9503) पहाटे साडेपाच वाजता अचानक कोंडाईबारी घाटातील पुलावरून 30 ते 35 फूट खाली कोसळले. याच ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम देखील सुरू आहे. पुलाच्या पिलरजवळच टँकर कोसळल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी तातडीने नजीकच्या महामार्ग पोलीस चौकीला याबाबत कळविले. महामार्ग पोलीस हवालदार संजय माळी, पाटील व हेमकांत कुमावत हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोल जागेवर उतरून मिळेल त्या साधनांनी तिघा जखमींना बाहेर काढले. रुग्णवाहिकेद्वारे त्यांना विसरवाडी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी देखील याच परिसरात ट्रॉला कोसळला होता. रात्री झालेल्या अपघाताची घटना सकाळी उघडकीस आली होती. त्यात चालक जागीच ठार झाला होता. आता ही दुसरी घटना घडली आहे. महामार्गाचे काम अर्धवट सोडून देण्यात आल्यामुळे या रस्त्याची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. यामुळे या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर अपघात होत आहेत. यामुळे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.