शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा तीन लाखांची चोरी लागलीच उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:05 IST

स्थानिक दोघांना अटक : मद्य दुकानातील चोरी, उपनगर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मद्य विक्रीचे दुकान फोडून सव्वातीन लाख रुपये चोरणा:या दोघांना 24 तासाच्या आत पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून रक्कम हस्तगत केली आहे. दोन्ही चोरटे नंदुरबारातीलच आहेत. त्यांच्याकडून इतरही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.जयेश भिकाजी गायकवाड (24) रा.संभाजीनगर व भावेश उर्फ भैय्या संजय पाटील (20) रा.हुडको कॉलनी नंदुरबार यांना अटक करण्यात आली आहे. नंदुरबारातील गिरिविहार गेटसमोरील मोरे वाईन्स या दुकानाचे शटर तोडून चोरटय़ांनी 18 रोजी रात्री तीन लाख 18 हजार 685 रुपये चोरून नेले होते. या घटनेच्या दोन दिवस आधीच जवळच असलेल्या जैन मंदीरातून देखील चोरटय़ांनी दानपेटी लांबविली होती. त्यातही 90 हजार रुपये चोरीस गेले होते. त्यामुळे उपनगर पोलीसांवर तपासाचे मोठे आव्हान होते. उपनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक संदीप रणदिवे यांनी गुप्त माहितीगारांकडू माहिती काढून संशयीतांवर पाळत ठेवली. त्यानुसार जयेश भिकाजी गायकवाड व भैय्या संजय पाटील हे हुडको कॉलनीत संशयीतरित्या फिरत होते. त्यांना पथकातील कर्मचा:यांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यावर त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. मोरे वाईन्स शॉपच्या शटरचे कुलूप तोडून गल्ल्यातील तीन लाख 18 हजार 685 रुपये चोरल्याचे त्यांनी सांगितले. त्यातील काही रक्कम त्यांनी पोलिसांना काढून दिली. या दोघांकडून शहरासह परिसरातील चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची  शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक किशोर सोन्याबापू नवले यांच्या मार्गदर्शनाखाली   पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, सहायक निरीक्षक सुनील बच्छाव, हवालदार रवींद्र शिरसाठ, केशव गावीत, भूषण बागुल, कपील बोरसे, दिनेश वसुले, अतुल गावीत, जगदीश पाटील, अरुण सूर्यवंशी, निलेश व्यवहारे, नितीन भालेराव यांनी    केली.