शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकुवानजीक दोन वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 13:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : दुचाकीचा अपघात होऊन पती-प}ी जागीच ठार तर चार महिन्यांची चिमुकली जखमी झाल्याची घटना अक्कलकुवानजीक मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, अक्कलकुवानजीकच 23 एप्रिल रोजी झालेल्या अपघातातील जखमी पतीचा उपचार घेतांना मृत्यू झाला तर  प}ी व सात वर्षाचा मुलावर उपचार सुरू आहेत. मंगळवार, 1 रोजी रात्री झालेल्या अपघातात राजेश जामसिंग ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : दुचाकीचा अपघात होऊन पती-प}ी जागीच ठार तर चार महिन्यांची चिमुकली जखमी झाल्याची घटना अक्कलकुवानजीक मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, अक्कलकुवानजीकच 23 एप्रिल रोजी झालेल्या अपघातातील जखमी पतीचा उपचार घेतांना मृत्यू झाला तर  प}ी व सात वर्षाचा मुलावर उपचार सुरू आहेत. मंगळवार, 1 रोजी रात्री झालेल्या अपघातात राजेश जामसिंग तडवी (27) व सरिता राजेश तडवी (25) रा.काकरापाडा, ता.अक्कलकुवा असे मयतांची नावे आहेत. पिंकी वय चार महिने ही बालिका जखमी आहे.काकरापाडा येथील तडवी दाम्पत्य आपल्या मोटरसायकलीने (क्रमांक जीजे 19- एस.5642) दलेलपूर येथे भाचीच्या साखरपुडय़ासाठी गेले होते. सायंकाळी साखरपुडा आटोपून ते परत काकरापाडा गावी जात असतांना ब:हाणपूूर-अंकलेश्वर महामार्गावर मिठय़ाफळी फाटय़ानजीक त्यांचा अपघात झाला. अपघातात तडवी दाम्पत्यांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. चार वर्षीय बालिका रस्त्याच्या बाजुला खोदलेल्या केबलच्या खड्डय़ात जावून पडल्याने ती बचावली.  अपघातानंतर मदतकार्य करणा:यांना केवळ दोनचजण असतील असे वाटत असतांनाच अचानक बालिकेच्या रडण्याचा आवाज आल्याने त्या दिशेने काही जणांनी धाव घेतली असता खड्डयात बालिका जखमी अवस्थेत पडलेली आढळली. तातडीने तिला खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.अपघात नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झाले नाही. अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. याबाबत अक्कलकुवा पोलिसात मोटर वाहन अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीचा मृत्यूदरम्यान, अक्कलकुवा तालुक्यातीलच देवमोगरा गावानजीक 23 एप्रिल रोजी प्रवासी रिक्षा व मोटरसायकल यांचा अपघात झाला होता. या अपघातातील संजय प्रताप जाधव रा.व्यारा, जि.तापी यांचा उपचार घेतांना 1 मे रोजी मृत्यू झाला. अपघातात संजय जाधव यांच्यासह त्यांची प}ी अनिता जाधव व सात वर्षाचा मुलगा सतिष जाधव हे देखील जखमी झाले होते.23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर देवमोगरा गावाजवळ भरधाव रिक्षाने (क्रमांक एमएच 39-डी 0208) समोरून येणा:या मोटरसायकलला (क्रमांक जीजे 19- एच 2189) धडक दिली. त्यात तिघेजण जखमी झाले होते. उपचार घेतांना संजय जाधव यांचा मृत्यू झाला.  हवालदार रवींद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक बन्सीराम आन्या पाडवी (37) रा.गंगापूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार रवींद्र ठाकरे करीत आहे.