शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात पाच वर्षात साडेतीनशे घरफोडय़ा तर सव्वाशेंची उकल

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: March 14, 2018 11:46 IST

क्राईम रिपोर्ट : लगतच्या राज्यांतील गुन्हेगारांचाही समावेश

संतोष सूर्यवंशी । लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 14 : संपूर्ण जिल्हाभरात चोरटय़ांनी चांगलाच धुमाकूळ घातल्याचे दिसून येत आह़े गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात एकूण 360 घरफोडय़ा झाल्या आहेत़ तर या प्रकरणी पोलिसांनी 125 गुन्ह्यांची उकल करुन आरोपींना जेरबंद केले आह़े यामध्ये 2014 साली जिल्ह्यात सर्वाधिक घरफोडीच्या घटना घडल्या असून एकाच वर्षात तब्बल 84 घरे फोडण्यात आली आह़े तर 2013 साली सर्वाधिक कमी म्हणजे 58 घरफोडीच्या घटना घडल्या असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली़ पोलिसांची डोकेदुखी वाढली.गेल्या पाच वर्षात म्हणजे 2013 ते 2017 मध्ये एकूण 360 घरफोडय़ांच्या घटना घडल्या आहेत़ त्यापैकी केवळ 125 घरफोडय़ांचीच उकल, शोध घेण्यास पथकाला यश आले आह़े त्यामुळे अजूनही 235 प्रकरणी आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करणे व चोरी केलेला ऐवज ताब्यात घेण्याचे आवाहन पोलीस प्रशासनासमोर आह़े सततच्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलीस कर्मचा:यांची डोकेदुखी वाढली आह़े त्याच प्रमाणे बहुतेक घरफोडय़ांच्या घटना हिवाळ्यात व लगAसराईत होत असल्याचेही जाणकारांकडून सांगण्यात आले आह़े त्यामुळे या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनानेही चांगलीच कंबर कसली असल्याचे सांगण्यात आल़ेबीट मार्शलची गस्तही कुचकामीरात्रीच्या घरफोडीच्या घटना थांबाव्या यासाठी पोलीस प्रशासनाकडून बीट मार्शलची नियुक्ती करण्यात आली आह़े परंतु त्याचाही फारसा उपयोग होत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे पोलीस गस्त अधिक वाढवावी अशीही मागणी आता होत आह़ेघरफोडीसोबतच नंदुरबार शहरात दुचाकी चोरटय़ांनीही उच्छाद मांडला आह़े गेल्या महिन्यात स्थानिक गुन्हे शाखेतर्फे तीन टोळ्यांकडून चोरीस गेलेल्या तब्बल 52 दुचाकी जप्त करण्यात आल्या आह़े या दुचाकी गुजरात तसेच मध्यप्रदेश राज्यात विक्री करण्यात येत असल्याचे सांगण्यात आल़ेसततच्या घरफोडय़ांबाबत नंदुरबार पोलिसांकडून सर्वाधिक लक्ष गुजरात व मधप्रदेश या लगतच्या राज्यांकडे केंद्रीत करण्यात येत असत़े घरफोडय़ांमध्ये जिल्ह्यातील गुन्हेगारांचा हात असला तरी बहुतेक गुन्हेगार हे घटनास्थळावरुन पसार होत गुजरातेत जात असतात़ त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी येथील पोलीस कर्मचा:यांना लगतच्या राज्यात सतत जावे लागत असत़ेवाढत्या बेरोजगारीमुळे जास्तकरुन युवक वर्ग घरफोडीसारखे गुन्हे करण्यास बळी पडत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आल़े यात, 18 ते 25 वयोगटातील युवकांचा मोठय़ा संख्येने सहभाग असतो़ दुचाकी चोरी करण्यामध्ये सराई गुन्हेगारांचा हातखंडा आह़े येथून चोरलेली दुचाकी गुजरात तसेच मध्यप्रदेश राज्यात निम्म्या भावात विकण्यात येत असत़े त्यामुळे यातून चोरटय़ांनाही चांगलेच ‘माजिर्न’ मिळत असल्याचे सांगण्यात आल़े अनेक घरफोडींच्या घटनांमध्ये बहुतांशी आरोपी हे जिल्ह्यातीलच असल्याचे सांगण्यात आल़े