नंदुरबार : घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधत तिघांनी घरात घुसून सामान लपवून अतिक्रमण केल्याची फिर्याद उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबारातील संभाजीनगरातील तात्याश्री बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. जयवंत बबन सूळ, गिरिजा जयवंत सूळ रा.अरविंदनगर व प्रकाश भाऊराव सूळ, रा.संभाजीनगर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत दिलीपकुमार ढाकणे यांनी फिर्याद दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आपण बाहेरगावी गेलो असता तिघांनी मिळून आपल्या घरात प्रवेश केला. घरातील सामान इतरत्र लपवून अतिक्रमण केले.
दिलीपकुमार ढाकणे यांनी याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सोनवणे करीत आहे.