शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

नंदुरबारात कुख्यात तीन दरोडेखोर केले जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:06 IST

एलसीबीची कारवाई : टोळीतील सहापैकी तीनजण अंधारात पसार, चार जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार

नंदुरबार : दरोडेखोरांच्या कुख्यात टोळतील तिघांना नंदुरबार स्थानिक गुन्हा अन्वेशन पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून घातक हत्यार जप्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यात मोठ्या दरोड्याच्या तयारीत तिघे होते. यापैकी दोघांवर नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात आठ ते नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली. दरम्यान, कारवाईत तीनजण अंधाराचा फायदा घेवून पसार झाले.गोट्या बंड्या काळे (२४) रा.रासेन, ता.कर्जत, जिल्हा अहमदनगर, सायराफ उर्फ साईराम जाना काळे (३५) व विक्की पावशा चव्हाण रा.शेकटा, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून मिरचीपूड, सूती दोर, १४ इंची लांब धारदार सुरा, ४४ इंच लांब लोखंडी टॉमी, करवत, लोखंडी गज आदी जप्त करण्यात आले.एकीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी आणि बंदोबस्ताचा ताण असतांना दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना दुहेरी कसरत करावी लागत आहे. कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीतील सदस्यांना पकडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले उपस्थित होते.टीप मिळताच कारवाई...पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले, शहरात शनिवार, २३ रोजी शिवजयंतीच्या मिरणुका सुरू असतांना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांना शहरातील भाऊ पेट्रोलपंप मागे पाच ते सहाजण दरोडा टाकण्याच्या तयारीत फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक त्या ठिकाणी पोहचले. या परिसरात बारकाईने शोध घेतला असता राजेंद्र फार्म हाऊसच्या परिसरात एका बंद बंगल्याच्या आडोश्याला काहीजण दबा धरून बसले होते. किशोर नवले व पथकाने या भागात सापळा लावून सहा पैकी तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांची माहिती घेतली असता त्यांच्यावर पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.चार जिल्ह्यांमध्ये शोध...अनेक दिवसांपासून पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर पोलिसांची झोप उडविणाऱ्या दरोडेखोरांच्या या टोळीच्या मागावर या जिल्ह्यांचे पोलीस होते. राज्यभर जाळे सक्रीय असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. खोटे नावे, गाव, वय सांगून गुन्ह्याची लवकर कबुली न देणे हा या टोळीचा खाक्या आहे. परंतु नंदुरबार पोलिसांनी रात्रीतूनच त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी शोधून काढली. अधीक तपासासाठी दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आल्याचीही माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील , अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार विकास पाटील, दिपक गोरे, प्रदीप राजपूत, योगेश सोनवणे, रवींद्र पाडवी, विनोद जाधव, प्रमोद सोनवणे, विकास अजगे, भटू धनगर, संदीप लांडगे, महेंद्र सोनवणे, राकेश मोरे, किरण मोरे, आनंदा मराठे, अभय राजपूत, सतिष घुले यांनी केली. पथकाला रोख बक्षीस देखील जाहीर केले.