लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पत्नीस तीन तलाक देणा:या पतीविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े विवाहितेने याबाबत फिर्याद दिली असून तीन तलाक कायद्यांतर्गत हा जिल्ह्यातील दुसरा गुन्हा आह़े शहरातील अलीसाब मोहल्ल्यात राहणा:या काफिया नुरु कुरेशी रा़ यांना पती नूरु मेहबूब कुरेशी याने 6 सप्टेंबर रोजी मारहाण करुन तीन तलाक दिला होता़ काफिया यांनी माहेरुन व्यापार करण्यासाठी दोन लाख आणावेत यासाठी नुरु हा वेळोवेळी मारहाण करुन छळ करत होता़ दरम्यान 6 रोजी त्याने थेट काफिया यांना तीन तलाक देत घरातून पळ काढला होता़ याप्रकरणी कफिया यांनी सोमवारी रात्री उशिरा शहर पोलीस ठाणे गाठून पती नुरु याच्याविरोधात फिर्याद दिली होती़ नुरु कुरेशी याच्याविरोधात कलम 498 सह मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा 2019 च्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण करत आहेत़
पत्नीस तीन तलाक देणा:या पतीविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:45 IST