अक्कलकुवा : शहराच्यालगतच्या सोरापाडा येथील महाकाली मातेच्या यात्रोत्सवानिमित्त भरवण्यात आलेल्या बैलबाजारात तीन दिवसात ३ कोटी २५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे़ याठिकाणी तब्बल ३ हजार बैलांची विक्री करण्यात आली आहे़१९ फेब्रुवारीपासून नवसाला पावणाऱ्या महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला होता़ यानिमित्त आवारातच तीन दिवसीय बैलबाजार भरवण्यात आला होता़ याठिकाणी सातपुड्याच्या दुर्गम भागासह गुजरात राज्यातून ५ हजार बैल विक्रीसाठी आणले गेले होते़ यातून पहिल्या दिवशी बैल खरेदी विक्रीतून २ कोटी ५० लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली़ अक्कलकुवा तालुक्यातील हंगामात पहिलीच यात्रा असल्याने येथील बैलबाजार हा बळीराजाचे प्रमुख आकर्षण आहे. यामुळे गुजरातसह मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे व्यापारी बैल खरेदीसाठी येथे आले होते़ बैल बाजारातील खरेदी-विक्रीची तेजी दुसºया दिवशीही कायम राहून ७५ लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली़ गुरुवारी रात्री उशिरापर्यंत बैलबाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु होते़
यात्रोत्सवातील बैलबाजारात सव्वा तीन कोटीची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:58 IST