शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी खर्चाचा बोगदा रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 11:09 IST

नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा : रहदारीचा ताण कायम, नागरिकही हैराण

ठळक मुद्दे नळवा रस्त्यावर दुसरा बोगदा तयार करावा यासाठी नगरपालिकेने रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. रेल्वेने संमती दिली परंतू त्याचा खर्च हा पालिकेने करावा अशी अट घातली. या कामासाठी येणारा खर्च पालिकेला परवडणारा नव्हता. त्यामुळे राज्य शासनाने खर्च करावा, त्यासाठी नि

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या दुस:या बोगद्याचे काम रखडले असून यामुळे रहदारीचा प्रश्न सुटत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, दुहेरीकरण कामाच्या वेळी या बोगद्याचे काम होणे अपेक्षीत असतांना त्याकडेही दुर्लक्षच करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी 96 लाख रुपये मंजुर आहेत. रेल्वे मार्गामुळे नंदुरबारचे दोन भागात विभाजन झाले आहे. या दोन्ही भागात अनेक कार्यालये, रहिवास वस्ती, शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे लाखो लोकांची ये-जा सुरू असते. परिणामी उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण वाढतो. शिवाय नळवा रस्त्यावरील बोगद्यात देखील वाहतुकीची खोळंबा होतो. ही बाब लक्षात घेता नळवा रस्त्यावर सध्या असलेल्या बोगद्याच्याच ठिकाणी आणखी एक नवीन बोगदा तयार करावा अशी मागणी करण्यात येत होती. रेल्वेने देखील त्याला मंजुरी दिली होती. परंतु निधीची बाब ही राज्य सरकारच्या अख्त्यारीतील बाब असल्यामुळे ती अडचण येत होती. दीड वर्षापूर्वी निधीचीही अडचण सोडविण्यात आली, परंतु दुस:या बोगद्याच्या कामाला काही सुरूवात झाली नसल्याचे चित्र आजही कायम आहे.नळवा रस्त्याचे आता बोगद्यापासून ते थेट नळवा हद्दीर्प्यत दुपदरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे या रस्त्याचा लूक बदलणार आहे. परंतु रेल्वे बोगद्याजवळच मोठी समस्या निर्माण होणार आहे. या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक, एलईडी पथदिवे लावण्यात येत आहेत. शिवाय दोन्ही बाजुला भुमिगत गटार देखील बनविण्यात येणार आहे. या रस्त्यावरून कुकरमुंडा, वेळदा यासह पश्चिम पट्टयातील अनेक गावांना जाणे सोयीचे ठरते.किरकोळ अतिक्रमणे निघतीलहा बोगदा तयार करण्यासाठी किरकोळ अतिक्रमण तोडावे लागणार आहे. ती जबाबदारी अर्थात  पालिकेची राहणार आहे. पालिका रेल्वेला अर्थात  काम करून देणा:या संस्थेला ही सोय करून देणार आहे. पक्की नसली तरी किरकोळ स्वरूपातील एक किंवा दोन अतिक्रमण काढावे लागणार आहे.पर्यायी मार्गसध्या उड्डाणपुलावरील वाहतुकीची रेलचेल पहाता नळवा रस्त्याला पर्याय म्हणून अनेकांनी स्विकारला आहे. आता दुसरा बोगदाही झाल्यावर या मार्गावरील वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे हाटदरवाजा ते बोगद्यार्पयतच्या रस्त्याचे मजबुतीकरण करणेही आवश्यक राहणार आहे.नवीन पर्यायी बोगदा हा सध्या असलेल्या बोगद्याला लागूनच राहणार आहे. तेंवढय़ाच लांबी रुंदीचा असलेला हा बोगदा सध्या असलेल्या बोगद्याच्या पश्चिमेला अर्थात डाव्या बाजूस राहणार आहे. हा बोगदा काँक्रीटीकरणातून तयार करण्यात येणार आहे. या बोगद्याला जोडणारा दोन्ही बाजूकडील रस्ता देखील या खर्चाअंतर्गत तयार करण्यात येणार आहे. या बोगद्यातून येण्यासाठी किंवा जाण्यासाठी मार्ग राहणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा इतरवेळी रहदारी खोळंबणार नाही. छोटी चारचाकी वाहने देखील बिनधिक्कत या बोगद्यातून ये-जा करू शकणार आहेत.