शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

साडेतीन हजार बालकांचा जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्थेचा अभाव, कोरोना क्वारंटाईन व आयसोलेशन वॉर्डसाठी वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लॉकडाऊन काळात वाहतूक व्यवस्थेचा अभाव, कोरोना क्वारंटाईन व आयसोलेशन वॉर्डसाठी वाढीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण होता़ या ताणातही जिल्ह्यात गर्भवती मातांची सुखरुप प्रसूती होवून ३ हजार ६५२ अर्भक जन्मास आली आहेत़ यातून जिल्ह्याचा जन्मदर सुरक्षित राहिला असल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिला आहे़२२ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर वाहतूक सेवा पूर्ण बंद करण्यात आली होती़ यातून दुर्गम भागासह सपाटीच्या तालु्क्यात कोरोनाव्यतिरिक्त उपचार घेणाºया नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला होता़ यावर मार्ग काढून सार्वजनिक आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय प्रशासन यांच्याकडून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात रुग्ण तपासणी सेवा सुरु ठेवण्यावर भर देण्यात आला होता़ यात प्रामुख्याने गर्भवती मातांना अडचणी येऊ नये यासाठी वैद्यकीय पथकांना अलर्ट ठेवत आरोग्य सेविका आणि आशांना ग्रामीण भागातील गर्भवती मातांच्या संपर्कात राहण्याचे आदेश होते़ मार्च ते जून या काळात सजगपणे राबवल्या गेलेल्या या उपक्रमामुळे साडेतीन हजार बालकांचा सुखरुपपणे जन्म झाला आहे़ गर्भवती मातांना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा त्या-त्या भागातील ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्यासाठी रुग्णवाहिका आणि इतर पर्यायी वाहने उपलब्ध करुन दिल्यामुळे बालकांचा मृत्यूदर कमी झाला होता़ यातून विभागाला जिल्ह्याचा जन्मदर अबाधित ठेवण्यात यश आले आहे़ जिल्हा आणि तालुकास्तरावर क्वारंटाईन सेंटर्स सुरु करुन वॉर्ड आणि बेडची संख्या वाढवणाºया आरोग्य विभागाने गर्भवती मातांचे कक्ष आणि पोषण पुनवर्सन केंद्रांकडेही विशेष लक्ष दिल्याने याठिकाणच्या अडचणी कमी झाल्या आहेत़विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात मार्च महिन्यात सर्वाधिक दोन बालकांचा जन्म झाला असल्याची माहिती समोर आली असून चालू आर्थिक वर्षातील जन्मलेल्या बाळांची ही सर्वाधिक संख्या आहे़

त्या-त्या भागातील एक हजारी नागरिकांमागे जन्म होणाऱ्या अर्भक संख्येनुसार जन्मदर ठरवला जातो़ जिल्ह्याचा जन्मदर हा गेल्या १० वर्षात समाधानकारक राहिला आहे़ लॉकडाऊनच्या तीन महिन्याच्या काळात ११७ बालकांचा मृत्यू झाला आहे़ यात मार्च महिन्यात ५०, एप्रिल २७ तर मे महिन्यात ४० नवजात अर्भकांचा मृत्यू झाला होता़ या मृत्यूची कारणे ही वेगवेगळी आहेत़ परंतू यात कोरोनामुळे दगावलेले एकही नाही़ जिल्ह्यात गर्भवती माताही कोरोनापासून दूरच राहिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़

तीन महिन्यात जिल्ह्याचा बालमृत्यू दरही राहिला आटोक्यात

नंदुरबार जिल्ह्याचा जन्मदर हा २०१९ या वर्षात १६़२६ तर मृत्यूदर हा ४़८६ एवढा होता़ २०२० या आर्थिक वर्षातील आकडेवारी अद्याप जाहिर व्हायची आहे़ दुसरीकडे इन्फंट मॉरटॅलिटी रेट अर्थात बालमृत्यू दरही यंदा स्थिर आहे़ जिल्ह्यात दर हजारी जन्म घेणाऱ्या बालकांपैकी २५ अर्भकांचा मृत्यू होतो़ ही बाब गंभीर असली तरी आरोग्य सेवेला बळ देण्यात येत असल्याने हा दर आटोक्यात आणण्यावर काम सुरु आहे़ महाराष्ट्र राज्याचा सर्वसाधारण बालमृत्यू दर हा १९ टक्के आहे़ सरासरी १ हजार जन्म घेणाºया बालकांमध्ये १९ बालकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी आहे़ नंदुरबारचा बालमृत्यू दर हा २५़७९ एवढा आहे़ लॉकडाऊन काळात यात वाढ होण्याची शक्यता होती़ परंतू आरोग्य यंत्रणा सजग राहिल्याने यावर नियंत्रण राहिल्याची माहिती देण्यात आली आहे़ कुपोषणामुळे लॉकडाऊन काळात हा दर वाढण्याची शक्यता होती़ परंतू विविध योजनांमुळे त्यावर नियंत्रण राहिले आहे़४जिल्ह्यात मार्च महिन्यात एकूण २ हजार ४५ बालकांचा जन्म झाला होता़ यात अक्कलकुवा तालुक्यात ३३४, धडगाव ३६१, नंदुरबार ६८७, नवापूर १९८, शहादा ३३६ तर तळोदा १२९ नवजात अर्भकांचा समावेश आहे़ या महिन्यात जिल्ह्यात १ हजार ७७ मुले तर ९६८ मुलींनी जन्म घेतला़एप्रिल महिन्यात जिल्ह्यात एकूण १ हजार ७७५ बालकांचा जन्म झाला़ यात ८८७ मुले तर ८८८ मुलींचा समावेश आहे़ अक्कलकुवा ३०५, धडगाव ३२९, नंदुरबार ५१०, नवापूर १६२, शहादा ३४२ तर तळोदा तालुक्यात १२७ बालकांच्या जन्माची नोंद आहे़मे महिन्यात जिल्ह्यात १ हजार ८५७ अर्भकांनी जन्म घेतला़ यात ९३७ मुले तर ९२० मुली आहेत़ अक्कलकुवा २८४, धडगाव ३८२, नंदुरबार ५३६, नवापूर १५७, शहादा ३६७ तर तळोदा तालुक्यात १३१ बालकांचा जन्म झाला आहे़जिल्ह्यात ६० प्राथमिक आरोग्य केंद्र, २९० उपकेंद्र, ११ ग्रामीण रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयासह जिल्ह्यात खाजगी रुग्णालयात जन्म घेतलेल्या बालकांची ही स्थिती आहे़ लॉकडाऊनमध्ये हे सर्व दवाखाने सुरु ठेवण्यात आल्याने गर्भवती मातांच्या अडचणी कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे़