शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
5
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
6
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
7
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
8
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
9
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
10
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
11
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
12
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
13
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
14
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
15
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
16
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
18
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
19
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

दुसऱ्या टप्प्यासाठी साडेतीनशे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 21:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाने कोरोनाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाने कोरोनाबाबत जनजागृती आणि सर्वेक्षण करण्यासाठी सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली असून त्यात ३५० पथकांचा सहभाग आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणात जे कुटुंब बाहेरगावी गेले होते त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणे प्रत्येक घरी जावून ऑक्सिजन पातळी व थर्मल गनद्वारे ताप मोजण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या सर्वेक्षणासाठी अक्कलकुवा तालुक्यात ५०, धडगाव ४७, नंदुरबार ८०, नवापूर ६१, शहादा ९० आणि तळोदा तालुक्यात ३१ पथक नेमण्यात आले आहेत. पथकात आशा सेविका, अंगणवाडी कार्यकर्ती तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अतिजोखिमीच्या व्यक्तींना दुसऱ्या टप्प्यात घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शनही करणार आहे. एखाद्या व्यक्तीत कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ स्वॅब चाचणी मोबाईल टीमद्वारे करून घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात आतापर्यंत तीन लाख ७४ हजार १८८ घरापैकी एकूण एक लाख नऊ हजार २०५ अधिक घरांना भेटी देण्यात आल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील एक लाख ११ हजार ९९७, अक्कलकुवा ३२ हजार ३२९, धडगाव ४४ हजार ९४७, नवापूर एक लाख ३४ हजार ४३५, शहादा एक लाख २२ हजार ३३५ आणि तळोदा तालुक्यातील ३६ हजार ७२५ असे एकूण चार लाख ८२ हजार ७६८ नागरीकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नागिरकांनी सहकार्य केल्याने ९१ टक्के नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यापैकी ८४ टक्के नागरिकांच्या ऑनलाईन नोंदीदेखील पूर्ण करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आरोग्य पथकाला तपासणीसाठी सहकार्य करुन प्रत्येकानी तपासणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.