लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बस स्थानक परिसरातील सबमर्सिबल दुकानातून मध्यरात्री दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडून मोनोब्लॉक व सबमर्सिबल यांच्या मोटारी चोरून नेल्या असे, एकूण एक लाख 29 हजाराच्या वस्तू चोरटय़ांनी लंपास केले आहेत. बस स्थानक परिसरात श्रीकृष्ण सबमर्सिबल सव्र्हिस सेंटर दुकान आहे. येथे परिसरातल्या शेतक:यांनी मोटारी व सबमर्सिबल मोटारी दुरुस्तीसाठी ठेवल्या होत्या. काही दुरुस्ती झाल्या तर काहीचे दुरुस्ती होणे बाकी होते अशातच 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री दुकानाचे शटर उघडून दुकानातील मोनोब्लॉकच्या चार तर सबमर्सिबलच्या अकरा मोटारींसह इतर साहित्य चोरटय़ांनी नेले. यात सुमारे एक लाख 29 हजार रूपयाचे नुकसान दुकानदाराचे नुकसान झाले आहे. ही चोरी दोन ते अडीज वाजेच्या सुमारास झाल्याचे सांगण्यात आले.या आधीही गोमती नदीच्या काठावर ठेवलेल्या मोटारी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. यात शेतकरी दिलीप ज्ञानदेव पाटील, हरि दत्तू पाटील यांच्यासह इतर शेतक:यांच्याही मोटारी आहेत. या घटना सहा महीने होत नाही तोच पुन्हा दुकानातून मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली.या वेळी हरि पाटील यांनी सांगितले की, इतर घटनेच्या शोध लागतो तर मग शेतक:यांच्या चोरीला गेलेल्या वस्तुंचा शोध का लागत नाही. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा अशी, मागणी केली आहे. या चोरटय़ांचा छडा लागला नाही तर शेतकरी उपोषण करतील असे त्यांनी सांगितले आहे.
दुकानातून चोरटय़ांनी सबमर्सिबल लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:35 IST