शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नव्या शैक्षणिक धोरणाबाबत जाहीर चर्चा हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वातंत्र्य मिळून सात दशकाहून अधीक काळ झाला असला तरी अद्यापही अनेक जण शिक्षणाच्या प्रवाहापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वातंत्र्य मिळून सात दशकाहून अधीक काळ झाला असला तरी अद्यापही अनेक जण शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब आहेत. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन करीत नव्या शैक्षणिक धोरणावर जाहीरपणे चर्चा झाली पाहिजे असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ नंदनगरीतर्फे रोटरी उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण येथील पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात झाले. यावेळी मेधा पाटकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारताचे माजी अभिभियोक्ता अ‍ॅड.राजेद्र रघुवंशी होते. व्यासपीठावर जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव अभिजीत मोरे, जिल्हा उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, रोटरी क्लब आॅफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेढारकर , सचिव मनोज गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मेधा पाटकर यांनी शिक्षणा संदर्भातील राष्टÑीय धोरणापासून तर सातपुड्यातील दऱ्याखोºयात सुरू असलेल्या शैक्षणिक परंपरेचा विस्तृत आढावा मांडत शिक्षकांचे प्रबोधन केले. नवीन राष्टÑीय धोरणासंदर्भात जाहिरपणे चर्चा व्हावी अशी अपेक्षाही व्यक्त केली.आज रेल्वे स्टेशनवर, सातपुड्याच्या दºयाखोºयात, बसस्थानकावर व अनेक सार्वजनिक ठिकाणी वंचीत, उपेक्षीत मुले दिसून येतात. ही मुले शिक्षणापासून अजूनही लांब आहेत. त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे नव्हे तर माणसाला माणूस म्हणून उपयोगी येईल असे शिक्षण देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. रोटरी क्लब आॅफ नंदनगरीने घेतलेल्या या उपक्रमाचेही त्यांनी कौतूक केले.अ‍ॅड.राजेंद्र रघुवंशी यांनी रोटरी क्लब आॅफ नंदनगरीने शिक्षक पुरस्कार देतांना प्रस्ताव न मागवता शिक्षकांचे कार्य लक्षात घेऊन जे पुरस्कार दिले ते खरोखरच उल्लेखनिय असल्याचे सांगत शैक्षणिक धोरणासंदर्भात आपले मत मांडले. शिक्षकांनीही प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. त्यासंदर्भात विविध उदाहरणेही त्यांनी मांडली.यावेळी पुरस्कारार्थी शिक्षकांमधून मुकेश पाटील, दिलीप गावीत, तुकाराम पावरा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पुरस्कारार्थीं शिक्षकांमध्ये रवींद्र अरुण गुरव, तळोदा, हारसिंग सोना पावरा, राजबर्डी, दिनेश रोहिदास पाटील, शहादा, तुकाराम सामल्या पावरा जीवन नगर, दिनेश सोमा पाडवी, डनेल, ता.अक्कलकुवा, दिलीप गावीत, बोरवण जि.प.शाळा, अन्सारी अकरम फरोग, शहादा, नरेद्र तुंबा पाटील, पळाशी, दिनेश यादवराव पाटील, नंदुरबार, रवीशंकर सामुद्रे, नंदुरबार, वसंत ओंकार पाटील, भालेर, ईश्वर भिला पवार, नंदुरबार, रोहिनी पाटील, लोय व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतून डी.पी.महाले, तळोदा यांचा समावेश आहे.याशिवाय शिक्षण क्षेत्रात काम करणारे नंदुरबार तालुका विधायक समितीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी, जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव अभिजीत मोरे, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, शिक्षक संघटनेतून मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर नांद्रे यांचा समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान आप्पासो.आ.ध.देवरे माध्यमिक विद्यालय विखरणचे मुख्याध्यापक दिनेश साळुंखे यांना मान्यवरांच्या हस्ते हॅण्ड फ्री सॅनिटायझर स्टॅण्ड देण्यात आले.सूत्रसंचालन किरण दाभाडे तर आभार अध्यक्ष नागसेन पेंढारकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रितिष बांगड, जितेंद्र सोनार, अनिल शर्मा, फकरुद्दीन जलगुनवाला, दिनेश साळुंखे, युनुस सैय्यद, हर्षल पाटील, राहुल पाटील, प्रेमानंद इंद्रजित, मनिष बाफणा, फय्याज खान, इकबाल शेख, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष आशिष खैरनार, सचिव पुष्कर सुर्यवंशी, सज्जाद सैय्यद, मनोज सुर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.