शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार गावांमध्येही कोरडक्षेत्राचा ‘विकास’ होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:07 IST

कृषी विभाग : जनावरांच्या खरेदीसाठी तुटपुंजी रक्कम

नंदुरबार : २० हजारात गाय किंवा म्हैैस आणि २५ हजारात ९ शेळ्या १ बोकड देऊन कोरडवाहू क्षेत्राचा विकास करण्याची शासनाची योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे़ शासनाने जाहिर केलेल्या दरात पाळीव प्राणीच खरेदी करणे शक्य नसल्याने योजना शेतकऱ्यांना डोईजड ठरत आहे़कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून प्रत्येकी चार गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबवला जात आहे़ यांतर्गत गायी म्हशी, शेळी, मूरघास तयार करणे, शेडनेट आणि पॅकहाऊस यासाठी शेतकºयांच्या प्रस्ताव मागवून त्यांनी बिले दिल्यानंतर त्यांच्या खात्यावर निधी देण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे़ परंतू शासनाने निर्धारित केलेल्या जनावरांच्या दरांचा फटका शेतकºयांना बसत असून शेतकरी प्रस्ताव देण्यासही धजत नसल्याचे दिसून आले आहे़ उर्वरित मूरघास, शेडनेट आणि पॅकहाऊस यांचीही नगण्य संख्या असून २०१४-१५ पासून वाटप करण्यात येणाºया अनुदानातून संबधित उपक्रम झालेच नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत आहे़ यामुळे दरवर्षी चार गावे निवडून नावालाच योजना राबवणाºया कृषी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़तालुकास्तरावर निवड करण्यात येणाºया गावासाठी २२ लाख रुपयांचा निधी वर्षभरात खर्च करण्याच्या या कार्यक्रमात शेतकºयांचा सहभाग हा तोकडा असल्याचे समजून येऊन विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ चार वर्षापासून नावालाच सुरु असलेल्या योजनेत दरवर्षी वाटप करण्यात येणाºया निधीच्या वापराबाबत योग्य पडताळणी होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे़फळबागा किंवा पिकपद्धतीने केलेल्या प्रकल्पासाठी निधी देण्याची तरतूद असूनही शासनाने जिल्ह्यातील एकाही शेतकºयास तसा निधी वितरीत केलेला नाही़ २०१४-१५ या वर्षात जळके रनाळे ता़ नंदुरबार आणि इच्छागव्हाण ता़ तळोदा ही दोनच गावे योजनेत होती़ २०१५-१६ या वर्षात सातुर्के ता़ नंदुरबार, चितवी ता़ नवापूर, वडगाव ता़ शहादा, भोगवाडे ता़ धडगाव तर २०१६-१७ या वर्षात करंजी खुर्द ता़ नवापूर, चाकळे ता़ नंदुरबार, जुने धडगाव ता़ धडगाव आणि सरी ता़ अक्कलकुवा या गावांचा समावेश करण्यात आला होता़ चार वर्षात झालेल्या कामांचा आढावाही विभागाने घेतलेला नसल्याचे समोर आले असून निधीच्या खर्चाबाबत आलबेल स्थिती असल्याची माहिती आहे़