लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्यच्या दालनातून चोरटय़ांनी 30 हजार रुपयांचे फर्निचर चोरून नेल्याची घटना लोणखेडा येथे 14 सप्टेंबर रोजी घडली. याबाबत शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणखेडा येथे कृषी महाविद्यालय आहे. 14 रोजी रात्री चोरटय़ांनी महाविद्यालयातील प्राचार्याचे कॅबीन, कार्यालयीन अधीक्षकांचे कार्यालय आणि बायोमेट्रीक प्रयोग शाळा आदींचे कुलूप तोडून चोरटय़ांनी फर्निचर चोरून नेले. त्याची एकुण किंमत 30 हजार रुपये आहे. 14 रोजी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर शहादा पोलिसांना कळविण्यात आले. याबाबत यतिश बधू पाटील यांनी फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक ईशी करत आहे.दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या भागात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.
लोणखेडा कृषी महाविद्यालयात चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:53 IST