शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गावच्या युवकाने ॲपलला केले अलर्ट; मिळाले तब्बल 11 लाखांचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 08:40 IST

डाटा सुरक्षित राहण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा (जि. नंदुरबार) : लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाऊ नये, यासाठी सुचविलेल्या उपाययोजना ॲपल कंपनीने ग्राह्य धरून अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील एका तरुणाला ११ लाख रुपयांचे बक्षीस दिले आहे. ओम कालिदास कोठावदे असे या युवकाचे नाव आहे. ॲपल कंपनीचा लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची भीती ओमला जाणवली. त्या अनुषंगाने त्याने शोध सुरू केला. चार महिन्यांपासून अमेरिकेतील ॲपल कंपनीच्या संपर्कात येऊन याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. 

यासह ॲपल कंपनीच्या सहकाऱ्यांशी बोलून लॅपटॉप स्क्रीन बंददरम्यान लॅपटॉपमधील डाटा चोरीला जाण्याची शक्यता असल्याचे त्याने पटवून दिले.  त्यावर उपाययोजना सुचवल्या, वेळोवेळी हा डेमो स्क्रीन शॉटच्या माध्यमातून व मेसेजिंगच्या माध्यमातून संबंधित कंपनीला केला. ॲपल कंपनीच्या निदर्शनास ती त्रुटी आली व त्यांनी तत्काळ तसे करून बघितल्यास खरंच डाटा चोरीला जात असल्याची भीती त्यांना निर्माण झाली. ओमने केलेल्या कार्याचे ॲपलने कौतुक केले व आभार मानले आहेत. या तरुणाला ॲपल कंपनीकडून १३ हजार ५०० डॉलर म्हणजेच जवळपास ११ लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. आश्रमशाळा पेचरीदेव, ता. अक्कलकुवा येथील मुख्याध्यापक कालिदास विठ्ठल कोठावदे यांचा तो मुलगा असून, त्याचे शिक्षण नंदुरबार येथे झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण तो सध्या पुणे येथे घेत आहे.

कंपनीची समस्या सुटली...nॲपलकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये म्हटले की, आपण पाठवलेला रिपोर्ट क्वॉलिफाई करण्यात आला आहे. यामुळे ॲपलची समस्या सोडण्यास मदत झाली आहे. nतुम्हाला १३.५ हजार डॉलर बक्षीस म्हणून जाहीर करीत असल्याचे सांगत आभार मानले आहेत.

टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन Xnandurbar-pcनंदुरबार