शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उपसरपंचाने पुलावरून उडी मारून संपविली जीवनयात्रा

By मनोज शेलार | Updated: February 26, 2024 17:19 IST

गिरासे हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास तापी पुलावर आले.

नंदुरबार : रामी, ता. शिंदखेडा येथील विद्यमान उपसरपंचांनी सोमवारी दुपारी सारंगखेडा, ता.शहादा येथील तापी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

रामी, ता. शिंदखेडा जिल्हा धुळे येथील विद्यमान उपसरपंच जवानसिंग काशिनाथ गिरासे (४३) असे मयताचे नाव आहे. गिरासे हे दुपारी दीड वाजेच्या सुमारास तापी पुलावर आले. पुलावर त्यांनी पॅन्ट आणि चप्पल काढून अचानक तापी पात्रात उडी घेतली. काही कळण्याच्या आत ही घटना घडल्याने पुलावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांनी आरडाओरड केला. घटनेची माहिती सारंगखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काही काळ पुलावर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती. पोलिसांनी वाहतूककोंडी सुरळीत केली. 

जवानसिंग शहादा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. रामी आणि पथारे येथील अनेक जण या कार्यक्रमात होते. टाकरखेडा येथील मासेमारी करणारे तरुण रमेश, लक्ष्मण, धनराज यांनी मृतदेह शोधण्यासाठी मदत केली. त्यांनी जवळपास दीड तासाच्या अथक प्रयत्नांनी मृतदेह शोधून नातेवाईकांच्या सुपूर्त केला. यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. सदरील हद्द दोंडाईचा ठाणे अंतर्गत येत असल्याने सारंगखेडा येथील सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी दोंडाईचा पोलिसांना घटनेची माहिती दिली. यावरून दोंडाईचा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.