शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

सणासुदीमुळे परिवहन विभागावर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 12:46 IST

गरजेनुसार जादा बसेस्चे नियोजन : भाडेवाढीचा प्रवासी संख्येवर परिणाम नाही

नंदुरबार : सध्या सुणासुदीनिमित्त परिवहन महामंडळावर ताण जाणवत आह़े 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान, एसटीची हंगामी भाडेवाढ करण्यात आली आह़े परंतु याचा परिणाम प्रवासी संख्येवर झालेला दिसत नाही़ लांब पल्यांच्या बसेस्मध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आह़े दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून नंदुरबार आगाराकडून सकाळी 8 वाजता नंदुरबार-अमदाबाद बस सुरु करण्यात येत आह़े तसेच दुपारी 12 वाजता वापी मार्गे नंदुरबार-बोरिवली ही नवीन बस सुरु करण्यात आली आह़े वाढत्या प्रवासी संख्येमुळे गरजेनुसार विविध मार्गावरील बसफे:या वाढविण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख  नीलेश गावीत यांनी सांगितल़ेदरम्यान, एसटी महामंडळाकडून 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली आह़े प्रमुख मार्गावरील भाडेवाढ पुढील प्रमाणे - नंदुरबार-मुंबई (दिवसा) सर्वसाधारण भाडे 500 रुपये भाडेवाढीनंतर 560 रुपये तर रातराणी बसचे सर्वसाधारण भाडे 600 रुपये व भाडेवाढीनंतर 660 रुपये, नंदुरबार-पुणे (दिवसा) सर्वसाधारण 535 रुपये, भाडेवाढीनंतर 590 रुपये तर रातराणीचे सर्वसाधारण 635 रुपये, भाडेवाढीनंतर 700 रुपये, नंदुरबार-नाशिक (दिवसा) सर्वसाधारण 275 रुपये, भाडवाढीनंतर 305 रुपये, रातराणीचे 325 रुपये, भाडेवाढीनंतर 360 रुपये, नंदुरबार-औरंगाबाद सर्वसाधारण 315 रुपये तर भाडेवाढीनंतर 345 रुपये, नंदुरबार-मालेगाव 210 रुपये भाडेवाढीनंतर 235 रुपये, नंदुरबार-पंढरपूर (दिवसा) सर्वसाधारण 675 रुपये, भाडेवाढीनंतर 725 रुपये, रातराणीचे 775 रुपये, भाडेवाढीनंतर 855 रुपये, नंदुरबार-कल्याण (रातराणी) सर्वसाधारण 610 रुपये, भाडेवाढीनंतर 670 रुपय़े दरम्यान, नंदुरबार येथून नाशिक व पुणे मार्गावर शिवशाही बस सोडण्यात येत आहेत़ नंदुरबार-नाशिक (दिवसा) सर्वसाधारण 410 रुपये, भाडेवाढीनंतर 450 रुपये, नंदुरबार-पुणे (शयन) सर्वसाधारण भाडे 1 हजार 145 रुपये असून यात कुठलीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही़ नंदुरबार-पुणे (सिटींग) 820 रुपये, भाडेवाढीनंतर 900 रुपय़े महसूली उत्पन्नात होणार वाढदसरा, दिवाळी, पाडवा, भाऊबीज आदी सणांच्या कालावधीत वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत असतो़ सध्या दिवाळीनिमित्त प्रवाशांकडून मोठय़ा प्रमाणात आप्तेष्टांकडे प्रवास करण्यात येत आह़े त्यामुळे साहजिकच एसटी महामंडळावरही याचा ताण जाणवत आह़े त्यातच दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या पाश्र्वभूमिवर एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आली असल्याने साहजिकच यातून एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार आह़े महामंडळाकडून दहा टक्के हंगामी भाडेवाढ करण्यात आली असली तरी याचा प्रवासी संख्येवर कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे दिसून येत आह़े तसेच सणासुदीचे दिवस लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बसेसचे नियोजन करण्यात येत आह़े ज्या मार्गावर मागणी असेल तेथे जादा बसेस सोडण्यात येणार आह़े तसेच दैनंदिन मुंबई बस कायम ठेवून 1 नोव्हेंबरपासून नंदुरबार-बोरवली ही नवीन बस सुरु करण्यात आली आह़े वापीमार्गे असलेली ही बस दुपारी 12 वाजता नंदुरबार येथून निघणार  आहेत़