शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

अक्कलकुव्यात दंगलीमुळे तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 12:03 IST

अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या : वाहने, दुकानांचे नुकसान, पोलिसांवर दगडफेक

अक्कलकुवा/खापर : बसमधील जागेचा वाद अक्कलकुवा येथे हाणामारीत आणि दंगलीत परावर्तीत झाला. संतप्त जमावाने दुकान, वाहने आणि पोलिसांवर दगडफेक करीत दहशत निर्माण केली. त्यांना नियंत्रीत करण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. बुधवारी रात्री उशीरापर्यंत ही धुश्मचक्री सुरू होती. नंदुरबारातून वाढीव पोलीस बंदोबस्त पोहचल्यावर जमाव पांगला. दरम्यान, शहरात तणाव पूर्ण शांतता आहे. एका गटाच्या फिर्यादीवरून दुसऱ्या गटाविरुद्ध तर पोलिसांकडून दोन्ही गटातील जमावाविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे.अक्कलकुवा येथील व्यापारी गौतमचंद राणुलाल जैन हे बुधवारी सायंकाळी नंदुरबार-सेलंबा बसने अक्कलकुवा जाण्यासाठी नंदुरबार बसस्थानकातून चढले. यावेळी त्यांचा बसमधील अकिल अहमद शेख रा.सितामढी (बिहार) यांच्याशी सीटवरील जागा सांभाळण्यावरून वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. अकील शेख यांनी गौतम जैन यांना बेदम मारहाण केली. बसमधील प्रवाशांनी त्यांना सोडविले. त्यांनी मोबाईलद्वारे त्यांची माहिती अक्कलकुवा येथील त्यांचा मुलगा अक्षय यांना दिली.जमाव हिंसक बनलाअक्षय त्यांचे नातेवाईक व पोलीस कर्मचारी अक्कलकुवा येथील आमलीबारी फाट्याजवळ बसची वाट पहात थांबले. तेथे अकील शेखच्या गटातील जमाव देखील थांबला. बस पोहचल्यावर पुन्हा मारहाण झाली. पोलिसांनी बस थेट पोलीस ठाण्यात नेली. तेथे पुन्हा दोन्ही गटातील जमाव जमला. पोलिसांनी त्यांना समजवून तेथून माघारी पाठविले. यातील एका गटाचा जमाव परत जातांना झेंडा चौक व फेमस चौकात हिंसक बनला. दगडफेक करीत वाहनांची, दुकानांची तोडफोड केली.अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अपुरे मणुष्यबळ असल्यामुळे जमावाला नियंत्रीत करण्यास अडचण आली. अखेर अश्रू धुराच्या दोन नळकांड्या फोडल्यानंतर जमाव तेथून पसार झाला.या दरम्यान जमावाने चार चाकी चार वाहने व दुचाकी एक वाहनाची तोडफोड केली. शिवाय दुकानाचे शटर उचकवून त्यातील १६ हजार ७०० रुपये रोख, दहा हजार रुपये किंमतीचे दुकानातील साहित्य चोरून नेले. तशी फिर्याद गौतमचंद जैन यांनी अक्कलकुवा पोलिसात दिली आहे.अतिरिक्त फोर्स रवानाजमावा अनियंत्रीत होत असल्याचे पाहून सहायक पोलीस निरिक्षक भंडारे यांनी अतिरिक्त कुमक मागविली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह अतिरिक्त कुमक अक्कलकुव्यात पोहचल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. शहरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी मोहिम सुरू केली आहे.